मुख पृष्ठ » तळातील दुवे » अभियांत्रिकी सल्लामसलत सेवा एलआयसी
अभियांत्रिकी सल्लामसलत सेवा एलआयसी

अभियांत्रिकी सल्लामसलत सेवा एलआयसी

एलआयसी तीचा अविभाज्य भाग असलेला अभियांत्रिकी विभाग असलेली आणि त्याचे कार्यान्वयन सर्व भारतभर १९५८ मध्ये सुरू केलेली आणि सध्या त्याचे ८ झोन असलेली भारतातील विमा उद्योगामधील एक अग्रगण्य आर्थिक संस्था आहे. स्थापना झाल्यापासून त्याच्या स्वत:च्या तांत्रिक कौशल्याने सुसज्य अभियांत्रिकी विभाग पूर्ण सेवाश्रेणी देऊ करीत आहे (दुस-या शब्दात सांगावयाचे म्हणजे व्यवहार्यता अभ्यास, जागेची निवड, नियोजन, वास्तू आणि अभियांत्रिकी रचना, बांधकाम, एकूण प्रकल्प व्यवस्थापन, वारसा इमारतींचा जीर्णोद्धार, प्रकल्पाला पूर्णत्व आणि अंतीम स्वरूप देण्यासाठी अंतर्गत सजावट आणि स्थळाची देखरेख) आणि दक्षता व सीटीई विभागाच्या पूर्वावलोकनामध्ये सुद्धा काम करणे. आम्ही मुल्यांकन आणि सल्ल्याची कामे सुद्धा स्विकारतो.

विभागाचा प्रमुख कार्यकारी संचालक (अभियांत्रिकी) आहे आणि झोनचे नेतृत्व मुख्य अभियंता यांचे कडून केले जाते. सध्या त्यात ४५० विविध संवर्गातील अधिक उत्तम प्रशिक्षित तांत्रिक आणि व्यवस्थापकिय व्यावसायिक यांचा समावेश आहे म्हणजे, मुख्य वास्तूविद्याविशारद/उप मुख्य वास्तूविद्याविशारदांपासून ते सहाय्यक अभियंतापर्यंत. विभागाने देशाच्या विविध भागातील महत्वाचे अभियांत्रिकी प्रकल्प आधुनिक वास्तूविद्याशास्त्रानुसार यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. या इमारतींची काही नावे “योगक्षेम”,मुंबई, “जीवन भारती”, न्यु दिल्ली, “एलआयसी बिल्डिंग”, चेन्नई, “जीवन सुधा” आणि “जीवन दीप”, कोलकता, “नॅशनल इन्शुरन्स ऍकेडमी”, पुणे, “इन्शुरन्स इन्स्टिट्युट ऑफ इंडीया”, बीकेसी, मुंबई, “झोनल ट्रेनिंग सेंटर – जीवन विद्या” हैद्राबाद इत्यादी. अशी आहेत. उभारण्यात आलेल्या इमारती सौंदर्यशास्त्र आणि टिकाऊपणा या दोन्ही गुणांसाठी वाखाणल्या जातात.

वापरकर्त्यांना अभियांत्रिकी विभाग वैय्यक्तिक लक्ष आणि सानुकूल रचना तसेच स्थिरता, अनुभव आणि अभियांत्रिकी संस्था असण्याचा एक बेजोड फायदा देऊ करतो. आमच्या स्वत:च्या (बांधण्यात आलेल्या आणि वंशपरंपरागत / वारसा इमारती)ची सुस्थिती आणि दैनंदिन देखभाल (स्थापत्य आणि विद्युत) विभागांतर्गत करण्यात येते. तसेच आमच्या आणि इतर संस्थांच्या मालमत्तांचे मुल्यांकन एक सल्लागार म्हणून आमच्याकडूनच पार पाडले जाते.

आम्ही नोडल अधिका-यांना सल्लागार म्हणून नेमणूक दिलेली आहे. नोडल अधिकारी आणि त्यांच्या टिमचे सदस्य सल्लादेण्याचे कार्य झोनल अभियांत्रिकी विभागाच्या समर्थ मार्गदर्शनाखाली करतात आणि सद्या संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी रू.१०० कोटींपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प हाताळत आहेत. टिम सर्वोत्तम काम देण्यात समर्पित आणि गुणवत्तापूर्ण , वेळेवर आणि आमच्या संस्थेच्या व्यापारचिन्हाप्रमाणे खर्च प्रभावी सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे.

मध्यवर्ती कार्यालय मुंबई
 

 

Top