मुख पृष्ठ » आमच्या टीम मध्ये सामील व्हा » फायदे
फायदे

फायदे

एक एलआयसी एजन्ट होण्य़ाच्या फायद्यांबद्दल अधिक माहिती करून घ्या

1. बक्षिसांची कारकिर्द
तुम्ही लोकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होऊन त्यांची स्वप्ने ओळखून देण्यात सहाय्य कराल. आपण त्यांच्या जीवनात घडवून आणत असलेला बदल हा आपल्या कल्पनेपेक्षा अधिकच फलदायी आणि समाधानकारक आहे.

2. एक यशस्वी टीम:
आमच्या बरोबर येण्याने, आपण देशातील विमा एजंटांच्या सर्वोत्तम टिमचा एक हिस्सा होऊन जाल. मागच्या वर्षी आम्ही मिलीयन डॉलर राउंड टेबल: एक जागतिक फोरम जे जगातील सर्वोच्च यशस्वी विमा एजंटांना अभिवादन करते त्यात १३१७ सदस्य पाठविले.

3.आकर्षक वेतन
आम्ही या उद्योगातील एक सर्वात जास्त चांगली मोबदल्याची कार्यप्रणाली देऊ करतो, जी फक्त तुमच्या चालू उत्पन्नाचीच नाही तर, भविष्यासाठीच्या उत्पनाची सुद्धा काळजी घेते. या शिवाय, आपण आपल्या उर्वरीत आयुष्यासाठी जेवढे संभाव्य उत्पन्न मिळण्याची इच्छा ठेवता तेवढे तुमचे उत्पन्नाचे उद्दिष्ट तुमचे तुम्हीच निश्चित करू शकता.

4. स्वातंत्र्य:
एक एजंट म्हणून तुम्ही एक खरे उद्योजक व्हाल. तुम्हाला तुमचे स्वत:चे बॉस असण्याचे स्वातंत्र्य आहे: तुमच्यासाठीच काम करा, तुम्ही स्वत:चे ग्राहक निवडा आणि तुमचे स्वत:चे पैसे बनवा . हे सर्व तुम्हाला सुरवातीची कोणतीही भांडवली गुंतवणूक न करावी लागता.

5. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण
आमचा विश्वास आहे की एलआयसी एजंट उर्वरीत एजंटांच्यापेक्षा वेगळा ठरवणारे सर्वोत्तम दर्जाचे प्रशिक्षण देत असतो. जरी आपल्याला विक्रीचा पूर्वानुभव नसेल तरी, आमच्या पात्र अंतर्गत प्रशिक्षण कर्मचा-यांकडून आयोजित बहुविध प्रशिक्षण कार्यक्रम, आपल्याला आयुर्विमा विक्रीमध्ये तज्ञ बनवतील.

6. करीअर एजन्सी प्रणाली प्रति बांधिलकी
करिअर एजन्सी सिस्टीमशी आमची वचनबद्धता म्हणजे, आम्ही तुम्हाला आणि तुमच्या प्रयत्नांना फक्त आजच नाही तर, व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर आधार देतो. आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये यशाच्या सर्वोच्च पातळीवर जाण्यासाठी धडपडणा-या आमच्या एजंटांना प्रोत्साहन देण्यावर आमचा विश्वास आहे. वस्तुत: आपल्या कामगिरीवर अवलंबून, आम्ही कंपनीबरोबर एक व्यवस्थापन कारकिर्दीचा पर्याय सुद्धा देऊ करतो..

7.पायाभूत सुविधा आधार
आम्ही आमच्या प्रत्येक शाखा कार्यालयामध्ये सर्वोच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी गुंतवणूक केलेली आहे. आपल्याला आवश्यक साधने, तंत्रज्ञान आणि लोकांच्या आधारासाठी प्रवेश असेल, जे आपल्याला एक दिर्घकालीन फायदेशीर व्यवसाय उभारण्यासाठी सक्षम बनवतील. .

8.संपूर्ण श्रेणी उत्पादने आणि सेवा
आपण आमची बेजोड उत्पादने आणि रायडर्स यांची ५० हून अधिक संयोजने, आपल्या ग्राहकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी मदत करताना देऊ करू शकतात. आपल्याला एक मोठी स्पर्धात्मक धार मिळवून देण्यासाठी , आम्ही सुद्धा नविन आणि अधिक कल्पक उत्पादनांच्यावर सातत्याने कार्यरत असतो..

9.विक्री आणि विपणन आधार  
आम्ही आमच्या एजंटांना विक्री आणि विपणनांच्या कल्पक साधनांनी आधार देत असतो. विक्री, प्रसार आणि विपणन हमी जी आम्ही देत असतो ती, तुम्हाला तुमचा व्यवसाय नविन उंचीवर नेण्यामध्ये सहाय्यकारी होईल. . 

10.अर्थिक बळ
एलआयसी तुम्हाला आणि तुमच्या ग्राहकांना अतुलनिय आर्थिक ताकद आणि भरीवपणा देऊ करते.

  
Top