मुख पृष्ठ » योजना » आम आदमी बिमा योजना
आम आदमी बिमा योजना

वैशिष्ठे

अर्थ मंत्रालय, भारत सरकार यांनी आम आदमी विमा योजना((AABY) आणि जनश्री विमा योजना (JBY) या सामाजिक सुरक्षा योजनांच्या विलिनीकरणाला मंजूरी दिलेली आहे.

सदर विलिनीकृत योजनेचे नामकरण “ आम आदमी विमा योजना”होऊन ती प्रत्यक्षात ०१.०१.२०१३ पासून अंमलात आलेली आहे.

A) योजनेचा तपशिल: :

1. पात्रता निकष: :
1. यात सदस्याचे वय १८ वर्षे पूर्ण ते नजिकच्या वाढदिवशी ५९ वर्षे या दरम्यान असावे.

2.सर्वसाधारणत: सदस्य कुटुंबप्रमुख असावा अथवा गरीबीरेषेच्या खालील (BPL) किंवा गरीबी रेषेच्या किंचीत वर पण ओळख व्यवसाय गट/भुमीहीन ग्रामीण कुटुंबामधील घरटी एक सदस्य कमवता असावा.

2. Nodal Agency

“Nodal Agency” याचा अर्थ असा होईल तो म्हणजे केंद्रीय मंत्रालयीन विभाग / राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश / इतर कोणतीही संस्थात्मक व्यवस्था /नियमा प्रमाणे चालविण्यासाठी व्यवस्थापनाच्या दृष्टीने नेमण्यात आलेली कोणतीही स्वयंसेवी संस्था. “भुमीहीन ग्रामीण घरांच्या” बाबतीत नोडल एजन्सीचा अर्थ योजना चालविण्यासाठी नेमलेली म्हणजे राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश असा असेल. 

3. वयाचा पुरावा: :

  • a) रेशन कार्ड
  • b) जन्म नोंदणी वहीचा उतारा
  • c) शालेय प्रमाणपत्राचा उतारा
  • d) मतदार यादी
  • e)प्रतिष्ठीत नियोक्ता/सरकारी बिभागा कडून देण्यात आलेले ओळखपत्र.
  • f) युनिक आयडी कार्ड (आधार कार्ड)

4. विमा हप्ता :

या योजनेखाली आकारण्यात येणारा हप्ता रू. ३०,०००/- च्या विमा संरक्षणासाठी सुरवातीला रू.२००/- प्रति सदस्य प्रति वर्ष असेल त्यापैकी ५०% सामाजिक सुरक्षा निधीमधून अनुदानित करण्यात येईल. भूमीहीन ग्रामीण घरांच्या (RLH) बाबतीत उर्वरीत ५०% हप्त्याचा भार राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश यांच्या कडून आणि इतर व्यावसायिक गटांच्या बाबतीत उर्वरीत ५०% हप्ता भार नोडल एजन्सी आणि/अथवा सदस्य आणि/अथवा राज्य सरकार / केंद्र शासित प्रदेश यांच्या तर्फे उचलला जाईल.

Top