Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » तळातील दुवे » नेहमी विचारले जाणारे प्रश्न
नेहमी विचारले जाणारे प्रश्न

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

नेट बॅंकींग मार्फत विमा हप्त्यांबाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?
तुमच्या एलआयसी विम्याचे हप्ते नेट-बॅंकिंग/फोन बॅंकिंग मार्फत भरण्याचे फायदे काय ?
या सोईमार्फत विम्याचे हप्ते भरण्यासाठी कोणत्या पॉलिसीज पात्र आहेत ?
ही सोय प्राप्त करण्यासाठी किती किंमत द्यावी लागेल ?
कोणत्या संस्था एलआयसी विम्याचे हप्ते त्यांच्या नेट-बॅंकिंग/फोन बॅंकिंग मार्फत गोळाकरण्यासाठी अधिकृत आहेत ?
अधिकृत बॅंकांकडे कोण नोंदणी करू शकतो ?
अधिकृत सेवापुरवठादारांकडे कोण नोंदणी करू शकतो ?
कोणत्या शहरांमधून अधिकृत सेवापुरवठादार कार्यान्वयन करतात ?
अधिकृत सेवापुरवठादार/बॅंकांच्या संकेतस्थळावर पॉलिसीचा तपशील कसा भरावयाचा ?
एलआयसी नोंदणीकृत पॉलिसीचा तपशीलाची पोच पावती कशी देते ?
मी विम्याचे हप्ते कधी भरू शकतो ?
बॅंक/सेवापुरवठादारंच्या मार्फत विम्याचे हप्ते कसे भरावेत ?
ही बॅंकेची पैसे भरण्याची सोय मिळवण्यासाठी महत्वाच्या कोणत्या मुद्यांची नोंद घेण्यात यावी ?

नेट बॅंकिंगमार्फत प्राप्त करण्यात आलेल्या विमाहप्त्यांच्या रकमेच्या बाबतीतील नेहमी विचारले जाणारे प्रश्न .

तुमचे एलआयसी विम्याचे हप्ते नेट-बॅंकिंग/फोन बॅंकिंग मार्फत भरण्याचे फायदे कोणते?
आपण आमचे पॉलिसीधारक म्हणून:-

 1. इंटरनेटच्या कधीही आणि कोठेही प्रवेशामुळे दिवसातून २४ तास गुणीले आठवड्यातून सात दिवस भरण्यांचा निर्णय घेऊ शकता आणि तो अधिकृत करू शकता .
 2. तुमच्या सोईप्रमाणे घरातून किंवा कार्यालयातून भरण्याची सूचना देऊ शकता आणि एलआयसी च्या शाखेची प्रत्यक्ष भेट टाळू शकता.
 3. पैसे भरण्यासाठी लाईनीमध्ये न उभे रहाता वेळेची बचत कराल.
 4. या अतिरिक्त सोईंसाठी आपल्याला एलआयसीला किंवा तीच्या अधिकृत एजन्सीला कोणताही आकार द्यावा लागत नसल्यामुळे आपण एलआयसीकडून मोफत सेवा मिळवू शकता
 5. आपण भरणा करण्यासाठी आपला एक किंवा सर्व बॅंक खात्यांची निवड सेवापुरवठादारांकडे नोंदणी करण्यासाठी करू शकता.
 6. आपण आपले कोणत्या खात्यावर रक्कम नावे पडावी याचा आगाऊ निर्णय घेऊ शकता.
 7. मधल्या काळात आपल्या सूचनांमध्ये बदल करू शकता.
 8. देय बॅंक आणि सेवापुरवठादारांकडून विमाहप्त्यांच्या थकबाकीबाबत स्मरणपत्रे आणि सूचना इमेलवर मिळतील.
 9. एलआयसीला पाठवावयाच्या भरण्यासाठीच्या पोस्टाच्या / कुरिअरचा खर्च टाळू शकता.
 10. बाहेरगावाहून पाठवावयाच्या विमाहप्त्यासाठी येणारा डीमांड ड्राफ्ट / पेऑर्डरच्या आकारांचा खर्च टाळू शकता.
 11. देय विमाहप्ते आणि इतर पॉलिसीचा तपशील सुद्धा पाहू शकता.

या सोईंमार्फत विमाहप्त्यांच्या भरण्यासाठी कोणत्या पॉलिसीज पात्र आहेत ?

 1. पॉलिसीज ज्या नेटवर्क शाखेमधून सेवा पुरवल्या जातात किंवा त्या पॉलिसीज ज्यांना मॅन (मेट्रो एरीआ नेटवर्क) किंवा वॅन (वाईड एरीआ नेटवर्क) मधून प्रवेश दिला जातो.
 2. अशा पॉलिसीज ज्यांचा भरणा प्रकार साधारण आहे उदा. वार्षिक (वायएलवाय), सहामाही (वायएलवाय) किंवा तीमाही (क्युएलवाय).
 3. सिंगल प्रिमीयमसारखा भरणा प्रकार असलेल्या पॉलिसीज, साधारण मासिक (एमएलवाय) आणि पगार बचत योजना (एसएसएस) या सोईमध्ये उपलब्ध होत नाहीत.
 4. पॉलिसीज त्या प्रभावी असल्याचे प्रतिबिंबीत होणा-या स्थितीतील असाव्यात. बंद पडलेल्या पॉलिसीज किंवा पुनरूज्जीवनासाठी देय असलेल्या पॉलिसीज वैध असणार नाहीत.

ही सोय मिळवण्यासाठी कोणती किंमत द्यावी लागेल?

 1. ही सोय एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी पूर्णपणे मोफत आहे.
 2. एलआयसीचे अधिकृत बॅंका / सेवापुरवठादारांसोबत करार करण्यात आलेले आहेत ज्याद्वारे एलआयसी सहसंमतीने मान्य करण्यात आलेले प्रतिव्यवहार आकार मासिकपद्धतीने देण्यात येतील. या भरण्याच्या सोईसाठी ग्राहकांना कोणतेही आकार लावण्यात येणार नाहीत.

कोणत्या संस्था एलआयसी विम्याचे हप्ते त्यांच्या नेट-बॅंकिंग/फोन बॅंकिंग मार्फत गोळाकरण्यासाठी अधिकृत आहेत?

 1. अधिकृत बॅंका:
  एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, बॅंक ऑफ पंजाब, युटीआय बॅंक, फेडरल बॅंक, कार्पोरेशन बॅंक आणि सिटी बॅंक.
 2. अधिकृत सेवापुरवठादार (कांही निवडक शहरांमध्येच उपलब्ध आहेत):
  बिलजंक्शन डॉट कॉम, टाइम्सऑफमनी डॉट कॉम, आणि बिलडेक्स डॉट कॉम.

अधिकृत बॅंकांकडे कोण नोंदणी करू शकतो?

 1. आपण आमचे एक पॉलिसीधारक म्हणून वरीलपैकी कोणत्याही अधिकृत बॅंकेच्या त्यांच्या भारतातील कोणत्याही शाखेत खाते असेल.
 2. आपण त्या संबंधित बॅंकेच्या नेट-बॅंकिंग सोईचा पर्याय निवडलेला असावा. त्याचा तपशील संबंधित बॅंकेकडून त्यांच्या संकेतस्थळामार्फत मिळवता येईल. नविन ग्राहकांसाठी डाउनलोड करता येणारे फॉर्म सुद्धा उपलब्ध आहेत.
 3. बॅंकेकडून पुरवण्यात आलेल्या लॉगिन आणि पासवर्डच्या सहाय्याने तुम्हाला नॆट-बॅंकिंगच्या खात्यामध्ये प्रवेश मिळवता आला पाहिजे.
 4. नॆट-बॅंकिंगच्या अधिक माहितीसाठी, तुम्ही संबंधित बॅंकेच्या संकेतस्थळावर लॉगिन करा.

अधिकृत सेवापुरवठादारांच्याकडे कोण नोंदणी करू शकतो?

 1. निवडक शहरांमधील कोणत्याही बॅंकेमध्ये खाते असताना जेथे उपरोक्त सेवापुरवठादारांची सेवा देण्यात येत असेल असे आमचे एक पॉलिसीधारक या नात्याने आपण.
 2. संपर्क साधण्यात आल्यानंतर सेवापुरवठादार आपल्याकडून आपल्या बॅंकखात्यात बिलाची रक्कम थेट नावे टाकण्यासाठी त्यांना अधिकृत करणारा लेखी आदेश मिळवतात. आपल्याला बॅंक खात्याचा तपशील आणि सेवापुरवठादारांना पाहिजे असलेली इतर आवश्यक माहिती द्यावी लागू शकेल.

कोणत्या शहरांमधून अधिकृत सेवापुरवठादार कार्यन्वयन करतात?

 1. बिलजंक्शन डॉट कॉम त्यांचे कार्यान्वयन मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई, बंगळूरू, हैद्राबाद, अहमदाबाद आणि पुणे येथून करतात.
 2. टाईम्सऑफमनी डॉट कॉम त्यांचे कार्यान्वयन मुंबई, दिल्ली आणि बंगळूरू येथून.
 3. बिलडेस्क डॉट कॉम त्यांचे कार्यान्वयन मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई, बंगळूरू, अहमदाबाद, पुणे आणि सुरत येथून. त्यांनी त्यांच्या सहकारी बॅंकांच्या बरोबर भागीदारी सुद्धा आहे उदा. बॅंक ऑफ बरोडा, आयडीबीआय बॅंक, अबीएन-एमरो बॅंक.

पॉलिसीचा तपशील अधिकृत बॅंक / सेवापुरवठादार यांच्या संकेतस्थाळांवर कसा दाखल करावयाचा?

 1. बॅंक /सेवापुरवठादारांनी पुरवलेल्या लॉगिन आणि पासवर्ड वापरून, तुम्ही बॅंक /सेवापुरवठादारांच्या संकेतस्थळावरील तुमच्या खात्यावर लॉग-ऑन करू शकता .
 2. तुम्हाला पॉलिसीच्या तपशील आणि इतर माहिती एलआयसी एक बिलर म्हणून नोंद करण्यासाठी द्यावा लागेल. सर्वसाधारणत: तुम्हाला पॉलिसी क्रमांक, विम्याचा द्यावयाचा हप्ता, इमेल आयडी आणि इतर तत्सम माहिती नोंदवावी लागेल. प्रत्येक पॉलिसीसाठी ही एकवेळेची प्रक्रिया आहे.
 3. कांही बॅंका / सेवापुरवठादारांच्या संकेतस्थळांवर बिलरांची नोंदणी करण्यासाठीची प्रक्रिया दर्शवणारे एक नमुन्याचे पान असते.

एलआयसी नोंदणीकृत पॉलिसीच्या तपशीलाची पोचपावती कशी देते?

 1. बॅंक / सेवापुरवठादार एलआयसीकडे तपशील वैधता आणि पुष्टीसाठी पूर्वनिश्चित अंतराने पाठवतात.
 2. एलआयसी नोंदणीची माहिती सत्यापित करते आणि बॅंक / सेवापुरवठादारांना नोंदणीच्या स्थितीबाबत कळवते. एलआयसीचा माहितीसाठा विकेंद्रीत असल्या कारणाने, सर्वसाधारणपणे नोंदणीच्या माहितीची पुष्टी करण्यासाठी आठवडाभराचा वेळ लागतो
 3. एलआयसीकडून नोंदणीकृत पॉलिसींच्या माहितीसाठा एकत्रीतपणे राखला जातो. हा माहितीचासाठा मूळ सेवाशाखेकडून मिळत राहणा-या बदलांच्या आधारावर ठराविक नियमीत अंतराने अद्ययावत केला जातो
 4. एलआयसी सुद्धा नोंदणीकृत पॉलिसीधारकांना नोंदणीच्या स्थितीची कळवणारी स्वयं-मेलपत्रे पाठवत असते.

मी विम्याचे हप्ते कधी भरू शकतो?

 1. नोंदणीच्या पुष्टीवर, एलआयसी नियमीतपणे देय तारीख, विम्याच्या हप्त्याची रक्कम, उशीराचे शुल्क, वैधतेची तारीख इत्यादी दाखविणारी बिले/देयके बॅंक /सेवापुरवठादारांकडे पाठवेल.
 2. जेंव्हा जेंव्हा नोंदणीकृत पॉलिसीच्या अंतर्गत विम्याचा हप्ता देय होतो, तेंव्हा एलआयसी देयके बॅंक /सेवापुरवठादारांकडे पाठवते आणि ही माहिती बॅंक /सेवापुरवठादारांकडच्या तुमच्या खात्यावर दर्शवण्यात येईल.

बॅंक /सेवापुरवठादारांच्या मार्फत विम्याच्या हप्त्याचा भरणा कसा करावयाचा ?

 1. तुम्हाला बॅंक /सेवापुरवठादारांच्या संकेतस्थळावर लॉग-ऑन करावे लागेल.
 2. संकेतस्थळाच्या पानावर तुम्हाला तुमच्या खात्यावर कोणत्या तारखेला नावे पडावी हे ठळकपणे सांगावे लागेल आणि भरण्याच्या मान्यतेसाठी क्लिक करावे लागेल. अनेक बॅंक खात्यांच्या बाबतीत तुम्ही एकादे विशिष्ट खाते सुद्धा निर्देशित करू शकता
 3. अधिकृत बॅंक तुमच्या खात्यावर रक्कम नावे टाकून, सर्व रकमा एकत्रीत करेल आणि एकत्रीत रक्कम एलआयसीला धनादेश/ पेऑर्डरच्या स्वरूपात पाठवून देईल.
 4. अधिकृत सेवापुरवठादार बॅंकेच्या शाखेला (तुमच्या आदेशाच्या फॉर्ममध्ये नमूद केल्याप्रमाणे) रिझर्व बॅंक ऑफ इंडीया (आरबीआय) च्या एलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीमच्या माध्यमातून सूचना पाठवेल आणि बॅंक तुमच्या खात्यावर रक्कम नावे टाकेल आणि सेवापुरवठादारांच्या बॅंक खात्यावर ती रक्कम जमा करेल, जे त्यानंतर ती रक्कम एल आयसीकडे पाठवून देतील
 5. कांही सेवापुरवठादारांकडे स्वयंचलीत भरण्याची सोय आहे (जेथे तुम्ही सेवापुरवठादारांना देयक जेंव्हा देय होते तेंव्हा तुमच्या खात्यावर रक्कम नावे टाकण्यासाठी स्थायी सूचना देऊ शकता.) किंवा फोन-बॅंकिंग सोय (जेथे तुम्ही फोनद्वारे भरणा करण्याची सूचना देऊ शकता)

पॉलिसीअंतर्गत भरण्यांचा हिशेब कसा ठेवला जातो?

 1. बॅंक /सेवापुरवठादारांकडील सर्व एकत्रीत भरण्याच्या रकमा स्विकारल्या जातात एलआयसीच्या शाखा ८८३ मध्ये (मुंबई विभागीय कार्यालय-I अंतर्गत) , योगक्षेम (पश्चिम भाग) तळमजला, नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१
 2. इंतरनेट मॉड्युलच्या बॅच प्रोसेसिंगच्या माध्यमातून विम्याच्या हप्त्यांचे व्यवहार आणि नुतनीकरण्याच्या विम्याच्या पावत्या प्रत्येक पॉलिसी क्रमांकासाठी तयार केल्या जातात
 3. त्याचसाठी विमा हप्त्यांच्या नुतनीकरणाच्या पावत्या छापल्या आणि साधारण पोस्टाने पाठविल्या जातात.
 4. शाखा ८८३ च्या व्यतिरिक्त शाखांच्या बाबतचे विमा हप्त्यांचे व्यवहार संबंधित सेवा शाखांकडे सध्याच्या नेटवर्क कार्यक्रमाच्या माध्यमातून पाठविले जातात.
 5. सर्व असमायोजित विमाहप्त्यांच्या गोळाकरण्यात आलेल्या रकमा सेवापुरवठादार / बॅंकांकडे परत पाठविल्या जातात. नोंदणीकृत पॉलिसीधारकांच्या इमेल आयडींवर नोंदण्या/भरण्यांची स्थिती सांगणा-या इमेल पाठविल्या जातील.

ही बॅंकेची पैसे भरण्याची सोय मिळवण्यासाठी महत्वाच्या कोणत्या मुद्यांची नोंद घेण्यात यावी?

 1. एकदा नेट-बॅंकिंग / फोन-बॅंकिंगच्या मार्फत विमाहप्त्यांच्या भरण्यासाठी नोंदणी करण्यात आल्यानंतर, तुम्ही रोख खिडकीवर रोखीने भरणाकरणे टाळायला पाहिजे, कारण अनेक असे प्रसंग असतात जेथे त्याच देय महिन्यांमध्ये दोनवेळा रक्कम प्राप्त झालेली असते.
 2. तुमच्या पॉलिसीच्या माहितीप्रमाणे नुतनीकरण पावत्या पोस्टाकडे पाठविण्यात येत असल्यामुळे कृपया ही खात्री करून घ्या की आपला पत्ता पॉलिसीच्या माहितीमध्ये अद्ययावत ठेवण्यात आला आहे.
 3. तुम्हाला नितनीकरण पावत्या मिळाल्या नसण्याच्या परिस्थितीत तुमच्या पॉलिसीच्या सेवा शाखेमधून तुम्ही विम्याचा ह्प्ता भरण्यात आल्याचा दाखला घेऊ शकता. कोणत्याही परिस्थितीत दुबार पावत्या छापता येत नाहीत.
 4. आम्ही माहितीसाठ्याची रचना विकेंद्रित ठेवली असल्या कारणाने गोळाकरण्यात आलेल्या रकमा ऑनलाईनवर समायोजित करता येत नाहीत, पॉलिसीची स्थिती अद्ययावत करण्यासाठी तुमच्या पॉलिसीच्या सेवा शाखेपर्यंत व्यवहार पोचावेच लागतात. म्हणून तुमच्या बॅंक खात्यात रक्कम नावे पडण्याची तारीख आणि पॉलिसीमध्ये अद्ययावत स्थिती ज्या तारखेला दर्शवण्यात येते ती तारीख यादरम्यान लहान वेळाचे अंतर असते.