Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » आमच्या टीम मध्ये सामील व्हा » कामाचे स्वरूप
कामाचे स्वरूप

कामाचे स्वरूप

एक ’एलआयसी’ चा एजंट काय काम करतो?

बहुतेक लोकांचा एक विमा कंपनीबरोबरचा पहिला संपर्क हा एका विमा विक्री एजंटाच्या माध्यमातूनच होत असतो. हे कर्मचारी आयुष्य, आरोग्य, आणि मालमत्तेसाठी सर्वोत्तम संरक्षण देणा-या विम्याच्या पॉलिसींची निवडकरण्यामध्ये व्यक्ती, कुटुंबे आणि व्यवसायांना मदत करतात. विमा विक्री एजंट जे केवळ एकाच विमा कंपनीसाठी काम करतात ते बांधील एजंट म्हणून ओळखले जातात. स्वतंत्र विमा एजंट्स किंवा दलाल जे अनेक कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करतात आणि त्यांच्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम दर आणि संरक्षण देण्या-या कंपनीच्या विमा योजनाच देऊ करतात. दोन्ही बाबतीत, एजंट अहवाल तयार करतात, माहितीचे अभिलेख ठेवतात, नविन ग्राहक शोधतात आणि कोणतीही हानी झालेली असल्यास पॉलिसीधारकांना त्यांच्या विम्यांचे दावे मिळवून देण्यासाठी मदतही करतात. अजून पुढे जाऊन कांही त्यांच्या ग्राहकांना अर्थिक विश्लेषण किंवा जोखीम कमीतकमी कशी होईल यासाठीच्या मार्गांचा सल्लासुध्दा देतात.

विमा उद्योगामध्ये सर्वसाधारणत: विमा विक्री एजंट आयुष्य, आरोग्य, अपंगत्व आणि दिर्घकालीन काळजी यासाठीच्या संपत्ती आणि अपघात, एक किंवा अधिक प्रकारच्या विम्यांचा “उत्पादक” म्ह्णून ओळखले जातात. दुचाकी अपघात, आग, चोरी, वादळ आणि संपत्तीला नुकसान पोचवणा-या इतर घटनांपासून होणा-या अर्थिक हानीपासून व्यक्ती आणि व्यवसायांना संरक्षण पुरवण्यासाठी संपत्ती आणि अपधाताचे विमा एजंट पॉलिसीज विकतात. व्यवसायांसाठी संपत्ती आणि अपघात विमा, जखमी कामगारांची नुकसान भरपाई, उत्पादन दायित्व दावे किंवा वैद्यकीय दुरूपयोग दाव्यांच्या बाबतीत सुद्धा संरक्षण प्रदान करतो.

एखाद्या पॉलिसीधारकाचा मृत्यु होतो तेव्हां आयुर्विमा एजंट लाभार्थींना पॉलिसींची विक्री करण्यात कुशल असतो. पॉलिसीधारकाच्या परिस्थीतीअनुरूप एक रोख-मूल्याची पॉलिसी निवृत्ती उत्पन्न, मुलांच्या शिक्षणासाठी निधी किंवा इतर फायद्यांसाठी पॉलिसीचा आराखडा तयार करता येतो. आयुर्विमा एजंटस निवृत्ती उत्पन्नाचे वचन देणारी वर्षासनांची सुद्धा विक्री करतात. आरोग्य विमा एजंट आरोग्याच्या लाभाची विक्री करतात. आरोग्य विमा एजंट वैद्यकीय उपचारांचा खर्च आणि आजारपण किंवा दुखापतीमूळे होणा-या उत्पन्नहानी पासून संरक्षण पुरवणा-या आरोग्य विमा योजनांची विक्री करतात. ते दातांचा विमा आणि अल्प आणि दिर्घकालावधीच्या अपंगत्वाच्या विमा पॉलिसींची विक्री सुद्धा करू शकतात.

विमा उद्योगामध्ये इंटरनेची वाढ ही एजंट आणि ग्राहकांच्या दरम्यान असलेले संबंध हळूहळू बदलवणारी आहे. मागील काळात एजंटचा खुपसा वेळ हा विपणन आणि नविन ग्राहकाला प्रोडक्ट्स विकण्यामध्ये खर्च करावा लागत असे. ती पद्धत आता बदलू लागली आहे. वाढत्यारितीने ग्राहक कंपनीच्या संकेतस्थळांवरून विम्याचे अंदाज मिळवत आहेत आणि नंतर थेट कंपनीकडे पॉलिसींच्या खरेदीसाठी संपर्क साधत आहेत. हा संवाद एजंटांचा सक्रियपणे नविन ग्राहक शोधण्यामधील वेळ कमी करत असतानाच, ग्राहकाला उत्तम किमतीमध्ये पॉलिसीची निवडकरण्यात फारमोठी सक्रिय भूमिका प्रदान करतो. कारण विमा विक्री एजंट सूचवण्यात आल्यामुळेसुद्धा अनेक नविन खाती मिळवतो, हे महत्वाचे आहे की तो नियमितपणे त्याच्या ग्राहकांसोबत त्यांच्या अर्थिक गरजा पूर्ण होतात की नाही याची खात्री करून घेण्यासाठी असलेले संबंघ जोपासतो . समाधानी ग्राहकवर्गामध्ये होणारी वृद्धी एजंटाच्या सेवेची इतर संभाव्य ग्राहकाकडे शिफारस करत असते,हीच या क्षेत्र प्रशिक्षणाच्या यशाची आहे.  

गुरूकिल्ली

आमचे एजंट सर्वसामान्य आणि विशिष्ट अशा दोन्ही व्यावसायिक कार्यक्रमातून जातात, ज्याचा त्यांना कंपनीच्या बाजारातील प्रोक्टक्टसबद्दल चांगल्या रितीने माहिती मिळवलेले असणे आणि ज्ञानी बनण्याचा होतो. यापुढील लक्ष केंद्रीत आहे ते संवाद , दिर्घकालीन नातेसंबंध हाताळणे यासारखे सॉफ्ट स्किल्स आणि विक्री कौशल्ये यावर, ज्या आयुर्विम्यासारख्या सेवा-प्रेरणा उद्योगाच्या बाबतीत फारच संबंधित आहेत.

सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणाच्या पायाभूत सुविधा, त्याला जोडून सर्वोत्तम विद्याशाखा, जे एजंट त्यांच्या दैनंदिन नोकरी/व्यवसायामध्ये व्यग्र असतात त्यांच्यासाठी, अपवादात्मक शिकण्याच्या वातावरणाची हमी देतात,

एक १७-१८ दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ’आयआरडीए’च्या बंधनकारक प्रशिक्षण आवश्यकता आणि ’एलआयसी’ च्या प्रोडक्ट प्रशिक्षणाचे प्रारूप याचा संपूर्ण समावेश असतो. उजळणी सत्र अशी खात्री करते की उमेदवाराला कोर्सचा संपूर्ण तपशील पूर्णपणे समजलेला आहे आणि तो परवाना परिक्षेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. सैधान्तिक प्रशिक्षण हे संभाव्य ग्राहकांच्या बरोबर अदलाबदली करून प्रत्यक्ष मुलाखती आयोजित करून देण्यात येते, ज्यामूळे एजंटाला त्यांचा व्यवसाय पहिल्या दिवसापासून कसा होईल याची जाणीव करून देते. प्रतिनिधींना व्यवसाय उभाकरण्यात स्वयंपूर्णता मिळवत असताना, विकास अधिकारी आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आधार देण्यात येतो.

कारकिर्दीच्या

एजंटाच्या व्यवस्थेमधील प्रवेशाच्या पहिल्या दिवसापासून त्याच्या किंवा तीच्या विकास अधिका-याबरोबरच्या व्यक्तीगत बैठकींमध्ये, एजंट व्यवसाय विकासाशी संबंधित वेगवेळे विषय आणि कारकिर्दीच्या प्रगतीबाबत चर्चाकरू शकण्याच्या माध्यमातून कारकिर्दीच्या विकासावर जोर देण्यात आलेला आहे. विमा उद्योगात कारकिर्दीची आखणी करण्याच्या पद्धतीने व्यवस्थापनाच्या असलेल्या अपेक्षांची सुद्धा चर्चा करण्यात येते.

एलआयसी’ मध्ये व्यवस्थापनात सामावून घेणे हा एक दुसरा कारकिर्दीच्या वाढीचा पर्याय आहे. हा कार्यक्रम एजंटाला व्यवस्थापनामध्ये एजंटांची टीम आणि व्यक्तिमत्वविकास यांचे नेतृत्व करण्याची फार मोठी संधी देऊ करून एक विकास अधिकारीम्हणून पूर्ववेळेची कारकिर्द घडविण्यासाठी मदत करतो.

पुरस्कार आणि ओळख.

’एलआयसी’ एजंट हे त्यांच्या कामगिरीसाठी सातत्याने ओळखले आणि पुरस्कृत केले जातात. वर्षभर असंख्य स्पर्धांच्या माध्यमातून एजंटांच्यामध्ये सशक्त स्पर्धा आणि त्यांच्या प्रत्यत्नांना ओळख प्राप्त होते. वर्षभरामध्ये एजंटांनी गाठलेल्या व्यवसायाच्या पातळीच्या प्रमाणात तो किंवा ती विविध क्लबचे सदस्य बनतात, जसे कार्पोरेट क्लब, चेअरमन क्लब इत्यादी. यापैकी प्रत्येक क्लबचे कामगिरीच्या पात्रतेचे विशिष्ट निकष असतात आणि या क्लबच्या सदस्यांना विदेशी आंतरराष्ट्रीय आणि घरगुती ठिकाणी प्रत्येक वर्षी होणा-या सेमिनारमध्ये उपस्थित रहाण्याच्या अधिकार असतो सल्लागार प्रतिष्ठेच्या एक विशेष आंतरराष्ट्रीय विमा सल्लागार क्लबच्या म्हणजे, एमडीआरटी (मिलियन डॉलर राऊंड टेबल ).साठी सुद्धा पात्र होऊ शकतो.

विमा विक्री एजंट – लक्षणीय पॉइंट्स

साधारणपेक्षा कमी वाढ असूनसुद्धा, कॉलेज पदविधर आणि सिद्ध विक्री क्षमता असलेल्या किंवा इतर व्यवसायीतील यश प्राप्त केलेल्या व्यक्तींसाठी ही एक चांगली नोकरीची संधी आहे.

यशस्वी एजंट नेहमीच फार मोठे उत्पन्न मिळवतात, परंतू जे विमा एजंटांचे काम गृहित धरतात ते कमिशनमधून त्यांच्या गरजा भागविण्यासाठीचे उद्धिष्ट गाठण्यासाठीचे पुरेसे मिळवण्यात अपयशी ठरतात आणि अखेरीस इतर कारकिर्दीकडे वळतात.

विमा पॉलिसी देऊ करण्याव्यतिरिक्त एजंट इतर अधिक अर्थिक उत्पादनांची विक्री करू लागले आहेत, जसे म्युच्युअल फंड, रिटायरमॆंट फंड्स, एनएससी इत्यादी.

Top