Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » आमच्या बरोबर का सामील व्हाल
आमच्या बरोबर का सामील व्हाल

आमच्या बरोबर का सामील व्हाल

एक एलआयसी एजंट आजच व्हा, का ते माहिती करून घेण्यासाठी पुढे वाचा.

कामाच्या अटी:

बहुतांशी विमा विक्री एजंट छोट्या कार्यालयात स्थित असतात, जेथून ते ग्राहकांशी संपर्क साधतात आणि ते विकत असलेल्या योजनांची माहिती देत असतात. थापी त्यांचा बराचसा वेळ हा त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर, ग्राहकांना भेटण्यासाठी स्थानिक प्रवासात,विक्री पक्की करणे किंवा दाव्यांच्या तपासणीत जात असतो. एजंट सर्वसाधारत: त्यांच्या कामाचे तास निश्चित करतात आणि त्यांच्या संध्याकाळच्या आणि सुट्टीच्या वेळच्या ग्राहकांच्या सोईने त्यांच्या बरोबरच्या मुलाखतींची आखणी करत असतात. जरी बहुतांशी एजंट आठवड्यातून ४०-तास काम करत असले तरी, कांहीजण आठवड्यातून ६०-तास किंवा त्याहून अधिक वेळ काम करतात. खास करून व्यापारी विक्री एजंट ग्राहकांच्या बरोबर त्यांच्या कामाच्या वेळातच भेटू शकतात आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी कागदपत्रे हाताळणे आणि संभाव्य ग्राहकासाठी सादरीकरण तयार करण्याचे काम करतात.

रोजगार

विमा विक्री एजंटांनी २००५ मध्ये सुमारे ११,००,००० एवढे रोजगार धारण केले.जरी बहुतांशी विमा एजंटांचे आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा यामध्ये प्राविण्य असले तरी, सर्व प्रकारच्या विम्याची विक्री करत असणा-या ’बहुविध’ एजंटांची संख्या वाढती आहे.

प्रशिक्षण, इतर गुणवत्ता, आणि प्रगती:

विमा विक्री एजंटांच्या कामासाठी बहुतेक कंपन्या आणि स्वतंत्र एजन्सीज कॉलेजच्या पदवीधरांना भाडॆपद्धतीने घेण्यासाठी प्राधान्य देतात—विशेषत: ज्यांनी व्यवसाय किंवा अर्थशास्त्र यांचे शिक्षण घेतलेले आहे. उच्च माध्यमिक पदवीधरांची कधीकधीच नेमणूक करण्यात येते, जर त्यांनी विक्री क्षमता सिद्ध केली असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये यश प्राप्त केलेले असेल तरच. खर तर, विमा विक्री एजंटांच्या कामामध्ये दाखल होणारे इतर व्यवसायांमधून हस्तांतरीत होत असतात. व्यावसायिक विमा विक्री करताना , एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील तांत्रीक अनुभवाची मदत त्याच व्यवसायाच्या क्षेत्रातल्यांना पॉलिसी विकत असताना होते.

परिणामस्वरूप, नविन एजंट हे इतर अनेक व्यवसायात येणा-याच्या पेक्षा जास्त जुने असण्याचा कल दिसून येतो. कॉलेजमधील प्रशिक्षणाची मदत एजंटांना विमा पॉलिसीचा तांत्रीक पैलू आणि विमा विक्रीची मुलतत्वे आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी होवू शकते. अनेक कॉलेजेस आणि विद्यापीठे विम्यामधील अभ्यासक्रम देऊ करत असतात, आणि कांही शाळा या क्षेत्रातील बॅचलर पदवी देऊ करतात. कॉलेजमधील अर्थ, गणित, लेखा, अर्थशास्त्र, व्यावसायिक गणीत, विपणन आणि व्यवसाय व्यवस्थापन यांचे अभ्यासक्रम विमा विक्री एजंटांना सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती विमा व्यवसायाशी कशी जोडलेली आहे हे समजून घेण्यासाठी समर्थ बनवतात. मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि सार्वजनिक संभाषण यातील अभ्यासक्रम विक्रीच्या तंत्रात सुधारणा घडवून आणण्यात उपयुक्त सिद्ध होवू शकतील. याशिवाय संगणक विस्तृत प्रकारच्या आर्थिक उत्पादनांवरील माहिती तात्काळ प्रदान करत असल्या कारणाने आणि मोठ्या प्रमाणावर एजंटांची कार्यक्षमता वाढवत असल्याने, संगणकाशी जवळीक असल्याने आणि लोकप्रिय सॉफ्टवेअर पॅकेजेस फार महत्वाची झाली आहेत.

विमा विक्री एजंटांनी आयआरडीएकडून परवाना प्राप्त केलाच पाहिजे. एजंटांना आयुर्विमा आणि सर्वसाधारण विम्यासाठी वेगवेगळे परवाने आवश्यक आहेत. परवाने त्याच अर्जदारांना जारी करण्यात येतात जे परवाना-पूर्व विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण करतील आणि जे आयआरडीएची विम्याची मुलतत्वे आणि विमा कायदे यांचा समावेश असलेली परिक्षा उत्तीर्ण होतील.

अशा असंख्य संस्था व्यावसायिक हुद्दा असलेले कार्यक्रम देऊ करतात जे एखाद्याचे प्राविण्य प्रमाणीत करतात, जसे आयुष्य, आरोग्य आणि सर्वसाधारण विमा, त्याचप्रमाणे एक आर्थिक सल्लागार म्हणून. जरी असे ऎच्छिक कार्यक्रम ग्राहकांची आणि नियोक्त्यांची एजंटाच्या संबंधित विशेषतांमधील चांगल्या समजूतीची खात्री पटवत असले, तरी एजंटांना सर्वसाधारणपणे विशिष्ट आकड्याच्या तासांचे निरंतर शिक्षण पूर्ण करणे त्यांचा हुद्दा कायम राखण्यासाठी आवश्यकता असते.

विमा एजंटांकडून विकण्यात येणा-या आर्थिक उत्पादनांमध्ये विविधता वाढत असल्याने, नियोक्ते सुद्धा निरंतर व्यावसायिक शिक्षणावर फार मोठा भर देत असतात. विमा एजंटांनासुद्धा ग्राहकांशी संबंधीत असणा-या बाबींच्या बाबतीत अद्ययावत राहणे महत्वाचे असते. कर कायद्यांमधील बदल, सरकारी लाभ कार्यक्रम आणि इतर राज्य आणि केंद्र सरकारचे विनियम ग्राहकांच्या विम्याच्या गरजांवर आणि ज्या पद्धतीने एजंट व्यवसाय करतो त्यावर परिणाम करतात. कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम घेऊन आणि संस्थाच्या आणि विमा संस्थांकडून प्रायोजित परिषदा आणि चर्चासत्रांमध्ये उपस्थित राहून एजंट त्यांचे विक्री कौशल्य वाढवू शकतात आणि विम्याच्या माहितीच्या आणि इतर आर्थिक सेवांच्या क्षेत्राचे विस्तारीकरण करू शकतात आयआरडीए ची सुद्धा विमा कायदे, ग्राहक संरक्षण आणि विविध विमा योजनांचे तांत्रीक तपशील केंद्रस्थानी ठेऊन निरंतर शिक्षण आवश्यकता आहे.

विमा विक्री एजंट लवचिक, उत्साही, विश्वासपूर्ण, शिस्तीचे, कष्टाळू आणि प्रश्नांची सोडवणूक करणारे असावेत. त्यांनी प्रभावीपणे संवाद साधावा आणि ग्राहकांचा विश्वास वाढवावा. कारण सर्वसाधारणपणे ते कोणत्याही देखरेखीशिवाय काम करतात, विक्री एजंटांना त्यांचे वेळेचे नियोजन चांगले करता आलेच पाहिजे आणि त्यांनी नविन ग्राहक शोधण्यात पुढाकार घेता आला पाहिजे.

एक विमा विक्री एजंट जो क्षमता आणि नेतृत्व दाखवतो, तो शाखा कार्यालयामध्ये एक विकास अधिकारी होऊ शकतो. कांही थोडेजण सहाय्यक शाखा व्यवस्थापन (विक्री) आणि उच्च विपणन जागांवर पुढे जातात. तथापी, अनेकजण ज्यांनी चांगला ग्राहकवर्ग उभा केलेला आहे ते विक्रीच्या कामातच कायम राहण्यास प्राधान्य देतात.