पर्यायांचा भरणा आणि विम्याचा हप्ता
1. विमाहप्त्यांचा भरणा : पॉलिसीच्या मुदतीत तुम्ही विम्याचे हप्ते वार्षिक किंवा सहामाही अंतराने नियमीतपणे भरू शकता.
विम्याचा हप्ता प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत पॉलिसीमध्ये प्रवेश घेतल्याच्या तारखेपासून पॉलिसीमधून बाहेर पडण्याच्या तारखेपर्यंत देय होईल आणि विमाधारक सदस्याचे वय, निवडलेली रूग्णालय रॊख रकमेच्या फायद्याची (एचसीबी) पातळी, विमाधारक सदस्य प्रमुख विमाधारक आहे किंवा इतर विमाधारक सदस्य आहे (पॉलिसीमध्ये एकापेक्षा अधिक सदस्यांच्या संरक्षणाच्या बाबतीत) यावर अवलंबून असतो. विमाह्प्त्याची पातळी प्रमुख विमाधारक आणि इतर विमाधारक सदस्यांच्या एकाच वयासाठा आणि एकाच संरक्षण पातळीसाठी वेगवेगळा असेल.
पॉलिसीच्या सुरू होण्याच्या तारखेपासून विम्याची हप्त्यांची ३ वर्षापर्यंत हमी असते. त्यानंतर म्हणजे प्रत्येक ३ वर्षांच्या शेवटी आयआरडीएच्या पूर्व परवानगीच्या अधिन राहून विषयाच्या खात्याचा ताळमेळ लावण्यासाठी विम्याच्या हप्त्यांचे पुनरावलोकन करण्याचा महामंडळ हक्क राखून ठेवते प्रत्येक स्वयंचलित नुतनीकरण तारखेला लागू असलेल्या दरांची, पुढील ३ वर्षांसाठी म्हणजे पुढच्या स्वयंचलित नुतनीकरण तारखेपर्यंत हमी असेल.
नुतनीकरणाच्यावेळी प्रत्येक विमाधारक सदस्याच्या बाबतीत विम्याचे दर पॉलिसीमध्ये अंतर्भाव होण्याच्यावेळी त्या सदस्याच्या असलेल्या वयावर अवलंबून असेल.
एखाद्या पॉलिसीसाठी आकारावयाचा एकूण विम्याचा हप्ता हा त्या पॉलिसीमध्ये समाविष्ट करावयाच्या प्रत्येक सदस्याच्या विम्याच्या हप्त्याची बेरीज असेल.
2. पद्धत आणि उच्च एचसीबा सूट:
पद्धत सूट:
वार्षिक पद्धत: तक्त्याच्या विमाहप्त्याच्या २%
सहामाही पद्धत: तक्त्याच्या विमाहप्त्याच्या १%
एचसीबी सूट: एखाद्या पॉलिसींतर्गत समाविष्ट करावयाच्या एखाद्या सदस्याच्या बाबतीत, जर एचसीबी ’१००० पेक्षा जास्त असेल, तर त्या सदस्याच्या बाबतीत आलेला विम्याच हप्ता एका रकमेने (’) खाली देण्यात आल्याप्रमाणे घटवण्यात येईल.
एचसीबी (’) |
पीआयसाठी |
प्रत्येक सदस्यांसाठी |
|
|
पीआय व्यतिरिक्त |
२००० |
५०० |
२५० |
३००० |
१००० |
५०० |
४००० |
१५०० |
७५० |
3. स्वयंचलित नुतनीकरण तारीख: 3. प्रत्येक विमाधारकाच्या बाबतीत विम्याच्या हप्त्याचा हप्ता पॉलिसीच्या सुरू होण्याच्या तारखेपासून ३ वर्षांच्या एका कालावधीसाठी हमी देण्यात आलेला असेल, म्हणजे पॉलिसीची पहिली ३ वर्षे. त्यानंतर, पॉलिसीच्या प्रत्येक तिस-या वर्धापनदिनाच्या शेवटी, आयआरडीएच्या पूर्व परवानगीच्या अधिन राहून, महामंडळाच्या अनुभवाचा आढावा घेण्यासाठी विमा हप्त्यांचे पुनरावलोकन करण्यात येईल. पॉलिसीमधील सर्व विमाधारकांच्या बाबतीत पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून ते संरक्षण समाप्तीच्या तारखेपर्यंत पॉलिसीच्या प्रत्येक तिस-या वर्धापनदिनाच्या शेवटी या विमा हप्त्यांच्या देय तारखा, ज्यावर विम्याच्या हप्त्यांचा हप्ता नुतनीकरण करण्यायोग्य होतो, त्याचा उल्लेख स्वयंचलित नुतनीकरण तारीख असा करण्यात येईल.
भविष्यात कोणत्याही स्वयंचलित नुतनीकरण तारखेच्यावेळी , विम्याच्या हप्त्याचा हप्ता ह्या प्रोडक्टच्या प्रचलित असलेल्यापेक्षा हा पॉलिसीमध्ये विमाधारकाचा समावेश करतेवेळी असलेल्या वयावर आणि महामंडळाच्या विमाहप्त्याच्या दरावर अवलंबून असेल.
4. पर्याय:
»अतिरिक्त नुतन सदस्याला संरक्षण: पॉलिसीच्या मुदतीच्या दरम्यान जर पीआयचा विवाह / पुनर्विवाह झाला, तर जोडीदार आणि सासू-सासरे यांचा पॉलिसीमधील समावेश विवाह / पुनर्विवाहाच्या तारखेपासून सहामहिन्यात करता येऊ शकेल, परंतू योगायोगाने पॉलिसीच्या किंवा समावेशाच्या तारखेपासून पुढे येणा-या वर्धापनदिनापासून संरक्षण सुरू होईल. वर्धित विम्याच्या हप्ता अशा पॉलिसी वर्धापनदिनापासून देय होईल.
त्याचप्रमाणे, पॉलिसी घेतन्यानंतर कोणतेही जन्माला आलेले / कायदेशिररित्या दत्तक घेतलेल्या मुलाचा ज्या तारखेला मुल वयाचे ३ महिने पूर्ण करते त्याच्या लगेच पुढच्या पॉलिसी वर्धापनदिनाच्या तारखेपासून समावेश करता येऊ शकेल. जर कायदेशिररित्या दत्तक घेतलेल्या मुलाचे वय ३ महिन्यांपेक्षा जास्त असेल, तर योगायोगाने पॉलिसीच्या किंवा दत्तक धेण्याच्या तारखेपासून लगेच पुढे येणा-या वर्धापनदिनापासून मुलाचा समावेश करता येईल. वर्धित विम्याच्या हप्ता अशा पॉलिसी वर्धापनदिनापासून देय होईल.
प्रत्येक अतिरिक्त सदस्याचा समावेश वर्धित विम्याचा हप्त्याच्या भरण्यावर आणि योजनेच्या विविध शर्ती आणि अटींच्या अधिन राहून होईल.
नविन जीवनाच्या कोणतीही वाढीला फक्त पीआय कडूनच परवानगी देण्यात येईल. सध्याचा जोडीदर, आई-वडील, सासू-सासरे आणि मुले, जर पॉलिसी घेताना समाविष्ट नसतील तर , या पॉलिसींतर्गत समाविष्ट होणार नाहीत.
जर पालकांपैदी दोन्ही (आई आणि वडील) जर जिवंत असतील आणि सवाविष्ट होण्यास पात्र असतील, तर एकतर दोघांचा समावेश करावा लागेल किंवा दोघांचाही सवावेश होणार नाही. पीआयला त्यादोघांमधून निवड करण्याचा कोणताही पर्याय असणार नाही. पॉलिसी खरेदी करतेवेळी किंवा अस्तीत्वातील पॉलिसींतर्गत नविन सदस्यांची वाढ करतेवेळी तीच अट सासू-सास-यांसाठी सुद्धा लागू होईल.
1. स्थलांतर पर्याय: 1. या योजनेंतर्गत समाविष्ट मुलांना निर्दिष्ट बाहेरपडण्याच्या काळाच्या शेवटी किंवा वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या नुतनीकरणाच्या वेळी एक योग्य
- 1. विन आरोग्य विमा पॉलिसी (अंडररायटिंगच्या अधिन राहून) घेण्याचा पर्याय असेल. सद्याच्या पॉलिसीमधून मुलाच्या सदस्य समाप्तीपासून ९० दिवसांमध्ये नविन पॉलिई खरेदी करण्यात यावी.
- 1. जर पॉलिसी प्रभावी असेल तर मागील वर्षांतील पूर्वी-अस्तीत्वात असलेल्या अटी आणि कालबद्ध अपवर्जनांसाठीचे सर्व गुण मिळवण्यास विमाधारक सदस्य पात्र असेल. बाकी असलेला प्रतिक्षा कालावधी आणि तथापी अपवर्जनाचा बाकी असलेला कालावधी मात्र नविन पॉलिसींतर्गत लागू होईल.
- सद्याच्या पॉलिसींतर्गत हे गुण स.ए.पातळीपर्यंत जास्तीजात उपलब्ध होतील
- विमा हप्त्यांच्या दरांसह इतर शर्ती आणि अटी नविन पॉलिसीला आहेत जशा आहेत त्या लागू होतील.
2. जलद रोकड सुविधा:2. जर विमाधारकापैकी कोणालाही यादीतील कोणत्याही साखळी रूग्णालयात कोणत्याही एमसीबीच्या श्रेणी I किंवा II अंतर्गत पात्र शस्त्रक्रियेमधून जात असेल तर, एक पीआय म्हणून तुम्हाला जलद रोकड सुविधा प्राप्त करण्याचा पर्याय असेल. या सुविधेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या कोणत्याही विमाधारकाच्या रूग्णालयात दाखल केलेल्या कालावधीत सुद्धा (शस्त्रक्रिया एकतर नियोजीत किंवा अपधातामुळे तातडीची असू शकेल) सुटका झाल्यानंतर फायद्याच्या दाव्यासाठी थांबून रहाण्या ऎवजी पात्र एमसीबी रकमेच्या ५०% उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेच्या पॉलिसी अटींच्या अंतर्गत अनुज्ञेय आणि एमसीबी परिभाषित रूग्णालयात दाखल करण्याच्या बाबतीत आणि श्रेणी I आणि II अंतर्गत नोदविलेल्या शस्त्रक्रियेसाठी ती फक्त एक आगाऊ रक्कम असेल तथापी ही महामंडळाच्या मंजूरीच्या अधिन असेल आणि ही आगाऊ रक्कम एमसीबी दावा रकमेच्या अंतीम समझोत्यामधून समायोजित करण्यात येईल.
ही आगाऊ रकमेची सुविधा तुमच्या बॅंक खात्याचा तपशील विहीन नमुन्यात दाखल करून उपलब्ध होईल. आगाऊ रक्कम तुमच्या बॅंक खात्यावर थेट जमा केली जाईल.
1. टर्म एशुरन्स रायडर: 1. तुम्ही पीआय, आणि/अथवा तुमचा जोडीदार एमसीबी स.ए. च्या समतुल्य पर्यायी रायडर म्हणून टर्म एशुरन्स निवडू शकता. ज्यासाठी टर्म एशुरन्स रायडर निवडलेला आहे, दुर्दैवी मृत्युच्या बाबतीत, मुदतीच्या दरम्यान मृत्यु झाल्यास टर्म एशुरन्स सम एशुअर्डच्या एवढी एक रक्कम देय होईल .
2. एक्सिडेंट बेनिफिट रायडर: 2. तुम्ही आणि/ अथवा तुमचा जोडीदार जर टर्म एशुरन्स रायडर निवडलेला असेल तर एक्सिडेंट बेनिफिट रायडर सुद्धा निवडू शकता. कमाल एक्सिडेंट बेनिफिट सम एशुअर्ड ही टर्म एशुरन्स रायडर सम एशुअर्डच्या एवढी असेल. अपघातामुळे दुर्दैवी मृत्युच्या बाबतीत एक्सिडेंट बेनिफिट सम एशुअर्डच्या एवढी एक रक्कम देय होईल.
या योजनेंतर्गत समाविष्ट करावयाच्या प्रत्येक जीवनाच्या बाबतीत प्रति पॉलिसी वर्षाला प्रति ’१०००/- एक्सिडेंट बेनिफिट सम एशुअर्ड ला ’०.५० अतिरिक्त विमाहप्त्याचा भरणा करून एक्सिडेंट बेनिफिट रायडर उपलब्ध होईल.
ज्या पॉलिसी वर्धापनदिनाच्या वेळी आणि त्यानंतर जेंव्हा टर्म एशुरन्स रायडर समाप्त होतो तेंव्हा या फायद्यासाठी अतिरिक्त विम्याचा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही.