लाभ स्पष्टीकरण
वैधानिक चेतावणी:
"काही फायदे खात्रीशीर आणि काही तुमच्या विमा व्यवसाय करणा-याच्या भविष्यकाळातील कामगिरी वर मिळणा-या परताव्याच्या प्रमाणात बदलणारे असतात. जर आपली पॉलीसी खात्रीशीर परतावा देऊ करत असेल तर ते या पानावरील स्पष्टिकरण तालिकेमध्ये “खात्रीशीर” असा स्पष्टपणे उल्लेख केलेला असेल. जर आपली पॉलिसी बदलता परतावा देऊ करत असेल तर या पानावरील स्पष्टिकरण भविष्यकाळातील गृहित धरलेले गुंतवणीच्या परताव्याचे दोन वेगळ्या प्रकारचे दर दर्शवतील. हे गृहित धरलेले दर खात्रीशीर नसतात आणि ती आपल्याला परत मिळणा-या मुल्याची कमाल-किमान पातळीही नसते, कारण आपल्या पॉलिसीचे मुल्य भविष्यातील गुंतवणुकीच्या कामगिरीसह इतर अनेक घटकांवर अवलंबून असते."
एलआयसी ची न्यु एंडॉवमेंट योजना

टीप:
- हे स्पष्टिकरण एक प्रमाण जीवनाला (वैद्यकीय, जीवनशैली आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून) लागू होते.
- वरील स्पष्टिकरणामध्ये बिनखात्रीशीर फायदे (१) आणि (२) हे गणन केलेले असल्यामुळे ते गुंतवणुकीच्या अंदाजी परताव्याच्या दराशी अनुक्रमे ४% प्रतिवार्षिक (परिस्थिती १) आणि ८% प्रतिवार्षिक (परिस्थिती २) शी सुसंगत आहेत. दुस-या शब्दात सांगावयाचे झाले तर, हे फायद्याचे स्पष्टिकरण बनवतानाच हे गृहित धरलेले असते की पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीमध्ये ’एलआयसी’ ला गुंतवणुकीचा अंदाजी परतावा दर परिस्थितीनुसार ४% प्रतिवार्षिक आणि ८% प्रतिवार्षिक असा मिळू शकेल. अंदाजी गुंतवणुक परतावादर खात्रीशीर नाहीत.
- या स्पष्टिकरणाचा मुख्य हेतू हा की या प्रोडक्टसच्या वैशिष्ठांची आणि काही प्रमाणात आकडेवारीच्या सहाय्याने वेगवेगळ्या परिस्थितीत मिळणारा फायद्यांचा ओघ यांची प्रशंसा करण्यासाठी ग्राहक सक्षम आहे.
विमा कायद्याचे कलम ४५, 1938:
कोणत्याही आयुष्याच्या विम्याच्या पॉलिसीवर ती प्रभावी झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षाची मुदत संपल्यानंतर विमा कंपनीला या आधारावर हरकत घेता येणार नाही की, विम्याच्या प्रस्तावामध्ये करण्यात आलेले एखादे विधान किंवा एखाद्या वैद्यकीय अधिका-याच्या अहवालामध्ये किंवा पंच किंवा विमाकर्त्याचा मित्र किंवा एखादा दस्तऎवज ज्या द्वारे पॉलिसी देण्यात आली ती माहिती चुकीची किवा खोटी होती. जोपर्यंत विमा कंपनी हे दाखवत नाही की, असे विधान हे महत्वपूर्ण होते किंवा जी महत्वपूर्ण माहिती उघड करावयाची होती ती दडवून ठेवण्यात आlली किंवा पॉलिसीधारकाने ती फसवणुकीने दिलेली आहे आणि पॉलिसीधारकाला माहिती देताना हे माहित होते की ती खोटी होती किंवा दडवण्यात आलेली वस्तूस्थिती जाहीर करण्यासाठी होती.
असे असले तरी या कलमामध्ये असे काहीही नाही जे विमा कंपनीला तो त्याचा हक्क असेल तर वयाच्या पुराव्याची कोणत्याही वेळी मागणी करण्यासाठी रोखू शकते, आणि कोणतीही पॉलिसी हरकत घेण्यासाठी मानण्यात येणार नाही, फक्त या कारणासाठी की पॉलिसीच्या अटी नंतरच्या पुराव्या प्रमाणे जुळवून घेतल्या आहेत की विमाकर्त्याच्या वयाचा पुरावा प्रस्तावामध्ये चूकीचा देण्यात आलेला आहे
सवलत मनाई (विमा कायदा, १९३८ चे कलम ४१):
- कोणालाही एकाख्या व्यक्तीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या, भारतातील कोणत्याही जीवनांचा किंवा मालमत्तांच्या जोखीमीच्या संदर्भातील विमा, नविन किंवा नुतनीकरण किंवा चालू ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे किंवा देण्याच्या प्रस्ताव करता येणार नाही, देय कमिशन मधील संपूर्ण अथवा अंशत: भाग प्रलोभनाच्या स्वरूपात किंवा पॉलिसीमध्ये दाखविण्यात आलेल्या विमा हप्त्यामध्ये सवलत तसेच कोणालाही पॉलिसी घेणे, नुतनीकरण करणे किंवा चालुठेवणे यासाठी सवलत घेता येणार नाही अर्थात प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात किंवा तालिके प्रमाणे विमा कंपनीने देऊ केलेल्या सवलती वगळून. तथापी विमा प्रतिनिधीने स्वत:च्या आयुष्याच्या विम्यासाठी स्वत: काढलेल्या पॉलिसीवर घेतलेली दलाली ही विमा हप्त्यावर घेतली सवलत म्हणून मानण्यात येणार नाही, आशा स्विकृतीच्या वेळेच्या बाबतीत पोट-कलमाच्या या अर्थामध्ये विमा प्रतिनिधी विहित अटी पूर्ण करून हे प्रस्थापित करतो की तो एक विमा कंपनीने नोकरीवर ठेवलेला खरा प्रतिनिधी आहे.
- कोणतीही व्यक्ती या कलमाच्या तरतूदींच्या पालनामध्ये कसूर करेल ती पाचशे रूपया पर्यंतच्या दंडास पात्र असेल.
टीप: “अटी लागू” ज्यासाठी कृपया पॉलिसी दस्तऎवज पहावा अथवा जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा.
"विमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे”;
नोंदणीकृत कार्यालय:
भारतीय आयुर्विमा महामंडळ
मध्यवर्ती कार्यालय, योगक्षेम,
जीवन विमा मार्ग,
मुंबई – ४०००२१.
वेबसाईट: www.licindia.in
नोंदणी क्रमांक: 512
Life Insurance Corporation of India –
Corporate Office : Yogakshema Building, Jeevan Bima Marg, P.O. Box No – 19953, Mumbai – 400 021
IRDAI Reg No- 512