Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » योजना » पेन्शन योजना » न्यु जीवन निधी
न्यु जीवन निधी

फायदे

 पॉलिसी दस्तऎवज (५ एमबी)

’एलआयसी’ची न्यु जीवन निधी योजना ही एक लाभासहीत परंपरागत योजना आहे, संरक्षण आणि बचतीच्या वैशिष्टांच्या संयोजनासहीत. ही योजना विलंब कालावधीमध्ये मृत्युपासूनचे संरक्षणछत्र पुरवते आणि सुपुर्द करण्याच्या तारखेला सजीवित असता वर्षासन देऊ करते. .

1. फायदे:

सुपुर्द करावयाच्यावेळेचे फायदे: जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल, सुपुर्द करावयाच्यावेळी जमा झालेले गॅरंटीड एडीशन्स, जो असेल तो बहाल करण्यात आलेला सोपा प्रत्यावर्ती बोनस आणि अंतीम अतिरिक्त बोनस यांच्यासह बेसिक सम एशुअर्डच्या एवढी रक्कम विमाधारकाला उपलब्ध करून देण्यात येईल.

विमाधारकाला लाभाची रक्कम वापरण्यासाठी पुढील पर्याय उपलब्ध असतील.

ए) एक तात्काळ वर्षासन खरेदी करणे
विमाधारकाला आयकर कायद्याच्या अंतर्गत मुभा आहे त्यापर्यंत सुपुर्द करण्यात आलेल्या उपलब्ध रकमेची भरपाई करण्याचा पर्याय असेल. सुपुर्द करावयाच्या वेळची उपलब्ध संपूर्ण रक्कम किंवा अदलाबदल केल्यानंतरची शिल्लक रक्कम परिस्थितीप्रमाणे तत्कालीन प्रचलित वर्षासनदराने तात्काळ वर्षासन खरेदी करण्यासाठी वापरण्यात येईल. विमा कायदा , १९३८ च्या कलम ४ .

च्या तरतूदींप्रमाणे शिल्लक रक्कम किमान वर्षासन रक्कम खरेदी करण्यासाठी पुरेशी असेल तरच अदलाबदल करण्यास मुभा देण्यात येईल.अ

जर, एकूण लाभांची रक्कम किमान वर्षासनाची रक्कम खरेदी करण्यास अपुरी असेल तर, उपरोक्त रक्कम विमाधारकाला एकरकमी अदा करण्यात येईल. .

किंवा

b)भारतीय आयुर्विमा महामंडळाची एक नविन एकल विमाहप्ताचे विलंबीत पेन्शन प्रोडक्ट खरेदी करणे
या पर्यायांतर्गत सुपुर्द करतेवेळी उपलब्ध असलेले संपूर्ण उत्पन्न, जर पॉलिसीधारक एकल विमाहप्त्याच्या विलंबीत पेन्शन प्रोडक्ट्ची खरेदी करण्यासाठी असलेले पात्रता निकषांची पूर्तता करत असेल तर, एकल विमाहप्त्याच्या विलंबीत पेन्शन प्रोडक्ट्ची खरेदी करण्यासाठी वापरण्यात येईल.

विमाधारकाला त्याचा/तीचा सुपुर्द करण्याच्या तारखेला उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकीचा पर्याय घेणार आहे तो या तारखेच्या सहामहिनेआधी कळवावा लागेल.

» डेथ बेनिफिट:
पहिल्या पाच वर्षांच्या दरम्यान मृत्यु झाल्यास: जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल, जमा झालेल्या गॅरंटीड एडीशनसह बेसिक सम एशुअर्ड एक रकमी देण्यात येईल किंवा वर्षासनाच्या स्वरूपात किंवा अंशत: एक रकमी आणि उर्वरीत वर्षासनाच्या स्वरूपात नॉमिनीला देण्यात येईल. .

पहिल्या पाच पॉलिसी वर्षांनंतर मृत्यु झाल्यास: जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल, जमा झालेले गॅरंटीड एडीशन्स, जो असेल तो बहाल करण्यात आलेला सोपा प्रत्यावर्ती बोनस आणि अंतीम अतिरिक्त बोनस यांच्यासह बेसिक सम एशुअर्ड एकरकमी किंवा वर्षासनाच्या स्वरूपात किंवा अंशत: एकरकमी आणि उर्वरीत वर्षासनाच्या स्वरूपात नॉमिनीला देण्य़ात येईल.
कोणत्याही परिस्थितीत, जर सर्व देय विम्याचे हप्ते भरण्यात आलेले असतील, तर एकूण डेथ बेनिफिट कोणत्याही वेळी एकूण भरण्यात आलेल्या विमाहप्त्यांच्या १०५% पेक्षा कमी असणार नाहीत (कर, असल्यास अतिरिक्त विम्याचा हप्ता आणि रायडरचा विम्याचा हप्ता वगळून) .
वर्षासनाची रक्कम ही देय एकरकमी रक्कम आणि तत्कालिन प्रचलित तात्काळ वर्षासनदरांवर अवलंबून असेल.

» गॅरंटीड एडीशनस: पहिल्या पाच वर्षात पूर्ण झालेल्या प्रत्येक वर्षासाठी बेसिक सम एशुअर्डच्या प्रति हजारी रू.५०/- गॅरंटीड एडीशनची तरतूद पॉलिसी करते.

» नफ्यामध्ये सहभाग: जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल, तर महामंडळाच्या अनुभवाप्रमाणे पॉलिसी ६व्या वर्षापासून नफ्यामध्ये सोप्या प्रत्यावर्ती बोनससाठी अशा दर आणि अटींवर ज्या महामंडळाकडून जाहीर होऊ शकतात, सहभागी होईल.
जर पॉलिसी किमान निश्चित कालावधीसाठी चालू राहीली असेल तर, या पॉलिसीअंतर्गत अंतीम (अतिरिक्त) बोनस सुद्धा जाहीर होऊ शकतो, ज्यावर्षी पॉलिसी एक तर मृत्युमूळे किंवा सुपूर्द करण्यामूळे क्लेममध्ये परिवर्तीत होते.

2. ऎच्छिक फायदे:

एलआयसी’चा एक्सिडेंटल डेथ आणि डिसएबीलिटी रायडर: ’एलआयसी’चा एक्सिडेंटल डेथ आणि डिसएबीलिटी रायडर अतिरिक्त विम्याचा हप्ता भरून नियमीत विमाहप्त्याच्या पॉलिसींतर्गत एक पर्यायी रायडर म्हणून उपलब्ध आहे. अपघातीमृत्युच्या बाबतीत , एक्सिडेंट बेनिफिट सम एशुअर्ड मूळ योजनेंतर्गत डेथ बेनिफिटच्या बरोबर एकरकमी देय होईल.अपघातामुळे येणा-या अपघातामूळे येणा-या अपघाती अपंगत्वाच्या बाबतीत (अपघाताच्या तारखेपासून १८० दिवसांमध्ये) एक्सिडेंट बेनिफिट सम एशुअर्डच्या रकमेच्या एवढी रक्कम पुढील १० वर्षे समान मासिक हप्त्यांमध्ये देण्यात येईल आणि भविष्यकालीन एक्सिडेंट बेनिफिट सम एश्युअर्डचे विमा हप्ते, तसेच बेसिक सम एशुअर्डचे विम्याच्या भागाचे हप्ते, जे या पॉलिसीखाली एक्सिडेंट बेनिफिट सम एश्युअर्डच्या एवदे आहेत ते माफ करण्यात येतील. जर पॉलिसी एकतर मृत्युमूळे किंवा उपरोक्त १० वर्षांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी सुपूर्द होण्यामूळे एक क्लेम झालेली असेल, तर अपंगत्वाच्या फायद्याचा हप्ता जो देय झालेला नसेल तो एकरकमी देण्यात येईल.

एक्सिडेंट बेनिफिट सम एशुअर्ड बेसिक सम एशुअर्डच्या रकमेपर्यंत एवढा, किमान रू १,००,००० आणि कमाल रू. ५० लाख (भारतीय आयुर्विमा महामंडळाकडील वैय्यक्तीक तसेच गट पॉलिसी अंतर्गत) याच्या अधिन राहून, निवडता येईल. हा फायदा बहाल करण्याच्या वयापर्यंतच उपलब्ध असेल.

Top