फायदे
’एलआयसी’ची जीवन शिखर (युआयएन: ५१२एन३०५व्ही०१)
’एलआयसी’ ची जीवन शिखर ही एक सहभागी होण्याची नॉन-लिंक्ड ,बचतीसह संरक्षणाची एकच विमा हप्त्याची योजना आहे, ज्यात जोखीमीसाठीचे संरक्षणछ्त्र तक्त्याच्या एकच विमा हप्त्याच्या दसपट आहे.
येथे प्रस्तावकाला मॅच्युरिटी सम एशुअर्ड निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो. देय विमा हप्ता हा निवडलेली मॅचुरिटी सम एशुअर्डची रक्कम आणि प्रवेशारंभाच्यावेळी ज्याच्या जीवनाची हमी घेतली त्याचे वय यावर अवलंबून असेल.
ही योजना कर्जाच्या सोईच्या माध्यमातून त्याच्या तरलतेच्या गरजांची सुद्धा काळजी घेते.
ही योजना विक्रीसाठी सुरवात केल्याच्या तारखेपासून जास्तीजास्त १२० दिवसाच्या कालावधीसाठी उघडी राहील.
1. फायदे :
a) 1) डेथ बेनिफिट:
पहिल्या पाच पॉलिसी वर्षाच्या कालावधीमध्ये मृत्यु झाल्यास:
जोखीमीची सुरवात होण्याच्या तारखेच्या आधी झाल्यास: भरलेल्या एकच विमाहप्त्याचा बिनव्याजी परतावा.
उपरोक्त एकच विमाहप्त्यामध्ये विमा घेतानाच्या निर्णयाप्रमाणे आकारण्यात आलेली असल्यास कोणत्याही जादा रकमेचा आणि करांचा समावेश नाही.
जोखीमीची सुरवात झाल्याच्या तारखेच्या नंतर झाल्यास: तक्त्याच्या एकच विमाहप्त्याच्या १० पट एवढी “सम एशुअर्ड ऑन डेथ” देय होईल.
पॉलिसीची पाच वर्षे पूर्ण झाल्यावर, पण विहीत परिपक्वतादिनाच्या पूर्वी मृत्यु झाल्यास:
ज्या असेल त्या “लॉयल्टी एडीशन’ सह तक्त्याच्या एकच विमाहप्त्याच्या १० पट एवढी “सम एशुअर्ड ऑन डेथ” देय होईल.
b)परिपक्वता फायदा:
परिपक्वतेच्या वेळी, ज्या असेल त्या “लॉयल्टी एडीशन’ सह “मॅचुरिटी सम एशुअर्ड” देय होईल.
c)लॉयल्टी एडीशन:
महामंडळाच्या अनुभवावर अवलंबून, लॉयल्टी एडीशनच्या स्वरूपात पॉलिसी नफ्यात सहभागी होईल. जर पॉलिसी किमान पाच वर्षे चालू राहीली असेल किंवा परिपक्वतेच्यावेळी पॉलिसीधारक सजिवीत असल्यास , महामंडळाकडून जाहीर होऊ शकणा-या निश्वित दराप्रमाणे आणि निश्चित शर्तींप्रमाणे, जे असेल ते लॉयल्टी एडीशन हे मृत्युच्यावेळी किंवा समर्पणाच्यावेळी देय होईल