फायदे
एलआयसी चा न्यु एंडॉवमेंट योजना (युआईएन: ५१२एन२७७व्ही०१)
’एलआयसी’ ची न्यु एंडॉवमेंट योजना एक सहभागी करणारी नॉन-लिंक्ड बचत कम संरक्षण देणारी योजना आहे जी एक संरक्षण आणि बचतीच्या वैशिष्टांचे आकर्षक संयोजन देऊ करते. हे एकत्रीकरण मयत पॉलिसी धारकाच्या कुटुंबाला मुदतपूर्तीच्या आधी कधीही अर्थिक आधार उपलब्ध करून देते आणि मुदतपूर्तीच्या वेळी सजीवित पॉलिसी धारकाला एक चांगली एकगठ्ठा रक्कम . ही योजना कर्जाच्या सोईमार्फत तरलतेच्या गरजांची काळजी सुद्धा घेते.
1.फायदे:
डेथ बेनिफिट:
विमा धारकाचा पॉलिसीच्या कालमर्यादेत जर मृत्यु झाला आणि जर त्याने विम्याचे सर्व देय हप्ते भरलेले असतील तर “मृत्युपश्चात निश्चित रक्कम” आणि जो असेल तो बहाल केलेला सोपा परिवर्तनीय बोनस आणि अंतिम अरिरिक्त बोनस यांची एकूण बेरीज असा परिभाषित डेथ बेनिफिट देय होईल. जेथे “मृत्युपश्चात निश्चित रक्कम” बेसिक सम एशुअर्डच्या पेक्षी जास्त किंवा एकूण वार्षिक विमा हप्त्याच्या दहा पट किंवा अशी परिभाषित केलेली असेल. हा डेथ बेनिफिट मृत्युच्या तारखेपर्यंत भरलेल्या विमा हप्त्यांच्या १०५% पेक्षा कमी असणार नाही.
जेथे विमा हप्ता कोणताही सेवाकर, असल्यास जास्तीचा विमा हप्ता आणि रायडरचा हप्ता वगळता.
मुदतपूर्ती लाभ: जर सर्व देय विमा हप्ते भरण्यात आले असतील,तर, पॉलिसीच्या मुदतीच्या समाप्तीनंतर सजीवित असता बेसिक सम एशुअर्डच्या सोबत जो असेल तो बहाल केलेला सोपा परिवर्तनीय बोनस आणि अंतिम अरिरिक्त बोनस हा एकरकमी देय होईल.
नफ्यामध्ये सहभाग: जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल तर, पॉलिसी महामंडळाच्या नफ्यामध्ये सहभागी व्हावी आणि महामंडळाच्या अनुभवाप्रमाणे जाहीर केलेल्या सोपा प्रत्यावर्ती बोनस प्राप्त होण्यासाठी हक्कदार व्हावी
जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल आणि काही निश्चित किमान काळासाठी चालू असेल तर ज्या वर्षी पॉलिसी एक तर पॉलिसीच्या मुदतीत मृत्यु क्लेम अथवा जीवित लाभ देयामध्ये परिवर्तीत होते त्यावर्षी या योजनेखाली सुद्धा अंतीम (अरिरिक्त) बोनस जाहीर होऊ शकतो.
2. ऎच्छिक फायदे:
एलआयसी चा डेथ एण्ड डिसऍबिलिटी बेनिफिट रायडर: ’एलआयसी’ चा डेथ एण्ड डिसऍबिलिटी बेनिफिट रायडर हा एक पॉलिसीच्या मुदतीत जास्तीच्या विमा हप्त्यासाठी पैसे भरून हा रायडर एक ऐच्छिक पर्याय म्हणून उपलब्ध आहे. पॉलिसीच्या मुदतीत अपघाती मृत्युच्या बाबतीत मूळ योजनेखाली एक रकमी एक्सिडेंट बेसिक सम एशुअर्ड सुद्धा डेथ बेनिफिट बरोबर देय होईल. अपघातामुळे येणा-या कायमस्वरूपी अपघाती अपंगत्वाच्या बाबतीत (अपघाताच्या तारखेपासून १८० दिवसांमध्ये) एक्सिडेंट बेनिफिट सम एशुअर्डच्या रकमेच्या एवढी रक्कम पुढील १० वर्षे समान मासिक हप्त्यांमध्ये देण्यात येईल आणि भविष्यकालीन एक्सिडेंट बेनिफिट सम एश्युअर्डचे विमा हप्ते, तसेच बेसिक सम एशुअर्डचे विम्याच्या भागाचे हप्ते, जे या पॉलिसीखाली एक्सिडेंट बेनिफिट सम एश्युअर्डच्या एवदे आहेत ते माफ करण्यात येतील.