Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » तळातील दुवे » स्पष्टीकरणकोश
स्पष्टीकरणकोश

स्पष्टीकरणकोश

क्रमांक

वर्ण-माला

स्पष्टीकरणकोशाचे नाव

स्पष्टीकरणकोशाचा अर्थ

1. एक्सीडेंट (अपघात) एखाद्या व्यक्तीस नुकसान / इजा पोहोचविण्यास कारणीभूत होणारी आणी जी अकल्पित व अन्न्वधानाने घडते अशी एखादी घटना किंवा प्रसंग.
    एक्सीडेंट बेनिफिट(अपघात लाभ) जो कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास, आश्वस्त रकमे इत्क्या रकमेचे हप्त्यांमधे प्रदानाच्या अतिरीक्त लाभाची तरतूद करतो आणी त्यानंतरच्या योजने अंतर्गत देय्य अस्लेले हप्ते माफ करतो.
    एज लिमीट्स (वय मर्यादा) निश्चित करण्यात आलेले किमान व कमाल वय, ज्यापेक्षा कमी व अधिक वयाच्या अर्जदारांचे अर्ज विमा कंपनी स्विकारणार नाही किंवा योजनांचे नुतनीकरण करणार नाही.
    एजंट (प्रतिनिधी) शासनाने परवाना दिलेला विमा कंपनीचा प्रतिनिधी, जो विम्याचे करार विषयक विनंती करतो, वाटाघाटी करतो किंवा करार घडवून आणतो आणी विमा कंपनीसाठी विमेदारांना सेवा देतो.
    एन्युईटी प्लॅन्स (वार्षिकी योजना) या योजना विमाधारकाला अथवा त्याच्या वैवाहिक साथिदाराला “ निवृत्तीवेतन” ( किंवा एकमुठी रक्कम व निवृत्तीवेतन यांचे मिश्रण ) प्रदान करण्याची तरतूद करतात. जर विमाकालावधीमध्ये या दोघांचा मृत्यू झाल्यास एकमुठी रक्कम निकटतम नातेवाईकास देण्याची तरतूद केली जाते.
    एप्लिकेशन फॉर्म (अर्ज) सामान्यत:एजंटने ( प्रतिनिधीने) आणि वैद्यकिय परिक्षकाने ( लागु असल्यास) अर्जदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भरला जातो व विमा कंपनीने पुरविलेला असतो.तो अर्जदाराने स्वाक्षांकित केलेला असतो व विमा योजना ( पॉलिसी ) दिली गेल्यास पॉलिसीचा एक भाग होतो.
    असाइन्मेंट (बेचन पत्र) असाइन्मेंट ( बेचनपत्र) म्हणजे कायदेशीर हस्तांतरण . एक पध्द्ती ज्यायोगे विमाधारक त्याचे हक्क अन्य व्यक्तीस देऊ शकतो.असाइन्मेंट पॉलिसी दस्ताऐवजावर मान्यता देऊन /पृष्ठांकन करून किंवा स्वतंत्र कराराद्वारे केले जाऊ शकते. असाइन्मेंटचे दोन प्रकार असू शकतात.
2. बी बेनिफिशरी (लाभार्थी) विमेदाराच्या मृत्यूनंतर विम्याचे उत्पन्न घेणारा म्हणून ज्याचे नाव पॉलिसीमधे नमूद केलेले आहे अशी / अश्या व्यक्ती किंवा संस्था ( उदा.महामंडळ , विश्वस्त संस्था वगैरे )
    बिझनेस इन्शुरन्स (व्यवसाय विमा) एक पॉलिसी ( योजना) जी लाभांचे संरक्षण, प्रथमत: , एखाद्या व्यक्तीला नव्हे तर एखाद्या व्यवसायाला देते.एखादा महत्वाचा कर्मचारी किंवा व्यवसायातील भागीदार अपंग झाल्यावर होणा-या सेवा नुकसानिची, नुकसान भरपाई व्यवसायाला देण्यासाठी अशी पॉलिसी प्रसृत केली जाते.
3. सी कॅन्सलेबल (रद्द होऊ शकणारी) आरोग्य विम्याचा करार जो योजनेच्या मुदती दरम्यान विमा कंपनी किंवा विमेदारा कडून रद्द होऊ शकतो.
    कोइन्शुरन्स (सहविमा)
  1. एक अशी तरतूद, ज्यामधे, विमेदार विमामुल्याच्या ठराविक प्रमाणापेक्षा कमी रकमेचा विमा कॅरी करत असेल तर , त्याला त्याच गुणोत्तराचे प्रमाणात, आवश्यक असणा-या रकमेशी असणा-या विम्याच्या रकमे इतकी मर्यादित नुकसान भरपाई मिळते.
  2. आरोग्य विम्यामधे अनेकदा आढळणारी तरतूद, ज्यामधे, विमेदार व विमा कंपनी, योजनेअंतर्गत कव्हर केलेले नुकसानदोघेही ठराविक प्रमाणात वाटून घेतात, उदा. ८०% विमाकंपनी तर २०% विमेदार.
    कन्व्हर्टिबल होल लाईफ पॉलिसी (दपरिवर्तनीय संपूर्ण जीवन विमा योजना) एक “ संपूर्ण जीवन विमा योजना” व “सावधी विमा योजना” यांचे मिश्रण, ज्यामधील तरतूदीनुसार, अत्यंत कमी विमा हप्त्या मधे कमाल जोखीम कव्हर केलेली असते, ज्यामधे जिवन विमेदार त्याच्या करकिर्दीच्या अगदी सुरूवातीच्या काळात असतो व ज्या योजनेमधे, योजना सुरू झाल्यापासून ५ वर्षानंतर ही योजना सावधी विमा योजनेमधे परिवर्तीत हऊ शकते.
    कव्हरेज (संरक्षण व्याप्ती) विमा करारा अंतर्गत पुरविलेल्या संरक्षणाची व्याप्ती; एखाद्या योजनेच्या अंतर्गत येणा-या अनेक जोखिमींपैकी कोणतीही एक.
4. डी डेज ऑफ ग्रेस (सवलतीचा कालावधी) विमाधारकाने विमा हप्त्याचा भरणा देय तारखेला केला पाहिजे. अश्या देय तारखेपासून १५-३० दिवसांच्या कालावधीमधे हप्ताभरण्याची मुभा असते, अश्या कालावधीला डेज ऑफ ग्रेस ( सवलतीचा कालावधी ) असे म्हणतात.
    डेफरमॆंट पिरीयड (लांबणीवर टाकलेला कालावधी) विमा असलेली निवृत्ती वेतन योजनेच्या सदस्यता तारखे पासून ते निवृत्ती वेतनाचा पहिला हप्ता मिळाल्याच्या तारखे दरम्यानचा कालावधी. सामान्यत: अश्या योजना, डेफरमेंट पिरीयडची किमान व कमाल मर्यादा विहीत करतात.
    डेप्रिसिएशन (घसारा) काही काळानंतर मालमत्तेच्या वापरामूळे मालमत्तेची झीज होऊन तिची किंमत कमी होणे वा नगण्य होणे. डेप्रिसिएशनचा वापर नुकसान झालेल्यावेळी मालमत्तेची प्रत्यक्ष रोख किंमत निश्चित करण्याकरिता केला जातो.
    डबल / ट्रिपल कव्हर प्लॅन्स (दुप्पट / तिप्पट संरक्षण असणा-या योजना) या योजना , योजनाकालावधीमधे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, आश्वस्त रकमेच्या दुप्पट / तिप्पट रक्कम परत देऊ करतात. परिपक्वता तारखेस हयात असल्यास,विमा उतरविलेल्या व्यक्तीस मोळ आश्वस्त रक्कम दिली जाते. या कमी हप्त्याच्या योजना असून गृहकर्जा सारख्या परिस्थितीसाठी सर्वात जास्त उपयुक्त असतात.
5. एम्बझलमेंट (अपहार) एखाद्याची काळजी घेण्याची जबाबदारी असणा-याने दुस-याचे मालमत्तेचा वा पैश्याचा गैरवापर किंवा अपहार करणे
    एण्डोवमेंट पॉलिसी (सावधी योजना) विमा उतरविणा-या व्यक्तीस वार्षिक हप्ता भरावयाचा असतो, जो योजना सुरू होतेवेळी विमाधारकाचे वय व योजनेची मुदत याचे आधारावर निर्धारित केला जातो. विम्याची रक्कम, ठराविक वर्षांच्या कालावधीचे शेवटास किंवा विमेदार व्यक्तीचा मृत्यू यापैकी जे आधी असेल, त्यावेळी देय्य असते.
    एक्सेस एण्ड सरप्लस इन्शुरन्स (अतिरिक्त आणि अधिशेष विमा)
  1. अशी विमा योजना ज्यात विशिष्ठ रकमेपेक्षा जास्त असणारे नुकसान कव्हर केले जाते, जेंव्हा त्या रकमेपेक्षा कमी असणारे नुकसान नियमित योजने अंतर्गत कव्हर केलेले असते.
  2. एखदी असामान्य किंवा एक वेळची जोखिम उदा. संगीतकाराच्या हाताचे झालेले नुकसान किंवा एखाद्या अधिवेशनातील अनेक धोके , ज्यासाठी बाजारातील सामान्य योजना संरक्षण पुरवित नाहीत.
    एक्सक्लुजन (अपवर्जन) ज्यासाठी योजना लाभ देत नाही, अश्या विशिष्ठ अवस्था किंवा परिस्थिती.
6. एफ फॅकल्टेटीव्ह रिइन्शुरन्स (ऎच्छिक पुर्नर्विमा) एक प्रकारची पुनर्विमा योजना ज्यामधे पुनर्विमा करणारी कंपनी पुनर्विमा घेऊ इच्छीणा-या अन्य विमा कंपनीकडून देऊ केलेली जोखीम स्विकारू शकते किंवा नाकारू शकते.
    फॅमिली इन्शुरन्स (कुटुंबाचा विमा) एका कराराद्वारे कुटुंबातील सर्व किंवा अनेक सदस्यांना विमा पुरविणारी योजना ,सामान्यत:,कुटुंबाला पोसणा-या प्रमुख व्यक्तीस संपूर्णा जीवन विमा व वैवाहिक साथीदार व पॉलिसी प्रसृत केल्या नंतर जन्माला आलेल्या मुलांसहित इतर मुलांना , लहान रकमेचा मुदतीचा विमा असतो.
    फिड्युशिअरी (विश्चस्त) अन्य व्यक्तीसाठी विश्वासाने काही ( मालमत्ता) धारण करणारी व्यक्ती
    फायर इन्शुरन्स (आगीचा विमा) आगीमूळे व विज कोसळण्यामूळे होणा-या नुकसानापासून, अधिक धूर व पाण्यामूळे झालेल्या नुकसानापासून संरक्षण. केंद्र शासनाने विकसित केलेल्या कार्यक्रमा अंतर्गत पुरापासून होणा-या नुकसानापासून संरक्षण पूर विमा योजनेमधे अत्यंत कमी किंमतीमधे उपलब्ध असते.
    फ्रान्चाईज इन्शुरन्स (विक्रीहक्काचा विमा) विम्याचे एक स्वरूप, ज्यामधे समान मालकाच्या कर्मचा-यांना किंवा एखाद्या मंडळाच्या सदस्यांना , एखाद्या व्यवस्थे अंतर्गत, ज्यामधे मालक किंवा मंडळ हप्ता गोळा करण्याचे व विमा कंपनीत भरण्याचे मान्य करतो/करते, वैयक्तिक विमा योजना, दिल्या जातात .
7. जी जी आय एस (विमा हमी रक्कम) भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जीवन अक्षय योजनेअंतर्गत, भविष्यातील निवृत्ती वेतन खरेदी करण्यासाठी एकमुठी खरेदी किंमत दिली जाते. या रकमेला जी आय एस असे म्हंटले जाते. पहिला हप्ता भरल्यानंतर एक महिन्याचे काळानंतर, दरमहा देय्य असलेल्या निवृत्ती वेतनाची रक्कम, योजना सुरू होताना विमेदाराच्या वयाचे आधारे करण्यात येते.
    ग्रॉस इन्शुरन्स वॅल्यू एलीमेंट - जी