Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » योजना » माघारी घेण्यातआलेल्या योजना » जीवन अक्षय- VI
जीवन अक्षय- VI

वैशिष्टे

पॉलिसी दस्तऎवजाचा

परिचय:
ही एक तत्काळ वर्षासनाची योजना आहे, जी एक ठोक रक्कम भरून खरेदी करता येते. योजना वर्षासनधारकाला त्याच्या आयुष्यभर नमूद वर्षासनाची रक्कम देण्याची तरतूद करते. वर्षासनाची रक्कम मिळण्याचे विविध प्रकार आणि पद्धती उपलब्ध आहेत. .

उपलब्ध पर्याय:

या योजनेंतर्गत पुढील पर्याय उपलब्ध आहेत.

वर्षासनाचा प्रकार:

 1. जीवनासाठी वर्षासन एकसमान दराने देय.
 2. वर्षासनधारकाला तो जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत ५, १०, १५ आणि २० निश्चित वर्षांसाठी आणि त्यानंतर वर्षासन देय. वर्षासनधारकाचा मृत्यु होण्यावर
 3. खरेदी किमतीच्या परताव्यासह जीवनाचे वर्षासन देय.
 4. वार्षिक ३% सोप्या वाढीच्या दराने जीवनाचे वर्षासन देय
 5. वर्षासनधारकाच्या मृत्युच्याबाबतीत जोडीदाराला त्याच्या/तीच्या जीवनकालावधीमध्ये ५०% जीवनाच्या वर्षासनाची तरतूद देय
 6. वर्षासनधारकाच्या मृत्युच्याबाबतीत जोडीदाराला त्याच्या/तीच्या जीवनकालावधीमध्ये १००% जीवनाच्या वर्षासनाची तरतूद देय.
 7. वर्षासनधारकाच्या मृत्युच्याबाबतीत जोडीदाराला त्याच्या/तीच्या जीवनकालावधीमध्ये १००% जीवनाच्या वर्षासनाची तरतूद देय.
 8. खरेदीची किमतीचा हयात असणा-या शेवटच्याला परतावा. तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता.

एकदा निवडण्यात आल्यानंतर पर्याय बदलता येणार नाही.

पद्धत:

»वर्षासन एकतर मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वर्षिक अंतराने दिली जाऊ शकते. तुम्ही वर्षासनाची कोणतीही देण्याची पद्धत निवडू शकता.

मूक वशिष्टे:

 1. विम्याचा हप्ता एकरकमी भरावयाचा आहे.
 2. किमान खरेदी किंमत:
  रू. १००,०००/- ऑनलाईन सोडून कोणतेही वितरण चॅनेल.
  रू.१५०,०००/- ऑल लाईन विक्रीसाठी.
 3. या योजने अंतर्गत कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही.
 4. खरेदीची किमत, वर्षासन इत्यादींसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.
 5. आरंभाच्या वेळी किमान मुभाप्राप्त वय ३० वर्षे (पूर्ण) आणि कमाल मुभाप्राप्त वय ८५ वर्षे (पूर्ण) आहे.
 6. वयाचा पुरावा आवश्यक.

वर्षासनाचा दर:
विविध पर्यायांतर्गत वार्षिक अंतराने देय वर्षासनाची रक्कम जी रू.१ लाखामध्ये खरेदी केली जाऊ शकते ती पुढीलप्रमाणे आहे:

शेवटच्या वाढदिवशी वय पर्यायांतर्गत वार्षिक वर्षासनाची रक्कम
( i ) ( ii ) (१५ वर्षे निश्चित) ( iii ) ( iv ) ( v ) ( vi ) (vii)  
३० ७१९० ७१६० ६८९० ५२५० ७०८० ६९७० ६८६०  
४० ७५१० ७४४० ६९३० ५६१० ७३१० ७१२० ६८९०  
५० ८१४० ७९५० ७००० ६२८० ७७६० ७४२० ६९३०  
६० ९३५० ८७९० ७११० ७५३० ८६४० ८०३० ७०१०  
७० १२०८० ९८३० ७२६० १०२२० १०५६० ९३७० ७१३०  
८० १७८८० १०४४० ७४८० १५८९० १४६०० १२३४० १२९०  

उच्च खरेदी किमतीसाठी प्रोत्साहन:

जर तुमची खरेदी किंमत रू.२.५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर उपलब्ध प्रोत्साहनामूळे तुम्हाला अधीक जास्त रकमेचे वर्षासन मिळेल. याशिवाय, ऑनलाईन विक्री करण्यात आलेल्या पॉलिसींसाठी वाढीव वर्षासना दराच्या मार्गाने १% सूट सुद्धा उपलब्ध होईल.

सेवाकर:

जे असतील ते, सेवाकर, सेवाकर कायद्याप्रमाणे आणि वेळोवेळी लागू असणा-या दराने लागू असतील.
पॉलिसीधारकाला खरेदी किमतीच्याबरोबर प्रचलित दराने असलेला सेवाकर देय होईल.

पेड-अप व्हॅल्यु:

पॉलिसीला कोणतीही पेड-अप व्हॅल्यु प्राप्त होत नाही.

सरेंडर व्हॅल्यु:

या पॉलिसी अंतर्गत कोणतीही सरेंडर व्हॅल्यु उपलब्ध नाही.

कर्ज:

या पॉलिसी अंतर्गत कोणतेही कर्ज उपलब्ध होत नाही.

कूलिंग-ऑफ पिरीयड::

जर तुम्ही असमाधानी ? पॉलिसीच्या “शर्ती आणि अटीं” बाबत असाल ? तर पॉलिसी आम्हाला पॉलिसी करार मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात करा. ती मिळाल्यावर आम्ही ती पॉलिसी रद्द करू आणि भरणा करण्यात आलेल्या विमाह्प्त्यांची रक्कम मुद्रांक शुल्काचा खर्च वजा करून आपल्याला परत करण्यात येईल.

विमा कायदा, १९३८ चे कलम ४५:

 • कोणत्याही आयुष्याच्या विम्याच्या पॉलिसीवर ती प्रभावी झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षाची मुदत संपल्यानंतर विमा कंपनीला या आधारावर हरकत घेता येणार नाही की, विम्याच्या प्रस्तावामध्ये करण्यात आलेले एखादे विधान किंवा एखाद्या वैद्यकीय अधिका-याच्या अहवालामध्ये किंवा पंच किंवा विमाकर्त्याचा मित्र किंवा एखादा दस्तऎवज ज्या द्वारे पॉलिसी देण्यात आली ती माहिती चुकीची किवा खोटी होती. जोपर्यंत विमा कंपनी हे दाखवत नाही की, असे विधान हे महत्वपूर्ण होते किंवा जी महत्वपूर्ण माहिती उघड करावयाची होती ती दडवून ठेवण्यात आली किंवा पॉलिसीधारकाने ती फसवणुकीने दिलेली आहे आणि पॉलिसीधारकाला माहिती देताना हे माहित होते की ती खोटी होती किंवा दडवण्यात आलेली वस्तूस्थिती जाहीर करण्यासाठी होती.
 • असे असले तरी या कलमामध्ये असे काहीही नाही जे विमा कंपनीला तो त्याचा हक्क असेल तर वयाच्या पुराव्याची कोणत्याही वेळी मागणी करण्यासाठी रोखू शकते, आणि कोणतीही पॉलिसी हरकत घेण्यासाठी मानण्यात येणार नाही, फक्त या कारणासाठी की पॉलिसीच्या अटी नंतरच्या पुराव्याप्रमाणे जुळवून घेतल्या आहेत की विमाकर्त्याच्या वयाचा पुरावा प्रस्तावामध्ये चूकीचा देण्यात आलेला आहे.

विमा कायदा, १९३८ चे कलम ४१

 • कोणालाही एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या, भारतातील कोणत्याही जीवनांचा किंवा मालमत्तांच्या जोखीमीच्या संदर्भातील विमा, नविन किंवा नुतनीकरण किंवा चालू ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे किंवा देण्याच्या प्रस्ताव करता येणार नाही, देय कमिशन मधील संपूर्ण अथवा अंशत: भाग प्रलोभनाच्या स्वरूपात किंवा पॉलिसीमध्ये दाखविण्यात आलेल्या विमा हप्त्यामध्ये सवलत तसेच कोणालाही पॉलिसी घेणे, नुतनीकरण करणे किंवा चालुठेवणे यासाठी सवलत घेता येणार नाही अर्थात प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात किंवा तालिके प्रमाणे विमा कंपनीने देऊ केलेल्या सवलती वगळून. तथापी विमा प्रतिनिधीने स्वत:च्या आयुष्याच्या विम्यासाठी स्वत: काढलेल्या पॉलिसीवर घेतलेली दलाली ही विमा हप्त्यावर घेतली सवलत म्हणून मानण्यात येणार नाही, आशा स्विकृतीच्या वेळेच्या बाबतीत पोट-कलमाच्या या अर्थामध्ये विमा प्रतिनिधी विहित अटी पूर्ण करून हे प्रस्थापित करतो की तो एक विमा कंपनीने नोकरीवर ठेवलेला खरा प्रतिनिधी आहे. .
 • असे असले तरी या कलमामध्ये असे काहीही नाही जे विमा कंपनीला तो त्याचा हक्क असेल तर वयाच्या पुराव्याची कोणत्याही वेळी मागणी करण्यासाठी रोखू शकते, आणि कोणतीही पॉलिसी हरकत घेण्यासाठी मानण्यात येणार नाही, फक्त या कारणासाठी की पॉलिसीच्या अटी नंतरच्या पुराव्याप्रमाणे जुळवून घेतल्या आहेत की विमाकर्त्याच्या वयाचा पुरावा प्रस्तावामध्ये चूकीचा देण्यात आलेला आहे.

टीप : संपूर्ण तपशीलासात्घी कृपया पॉलिसी दस्तऎवज पहा किंवा सर्वात जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा.