Navigation

गोपनियता धोरण

गोपनियता धोरण
  1. एलआयसी त्यांचा उपरोक्त सामग्रीचा कोणताही भाग त्यांच्या इच्छेने जेंव्हा आवश्यकता असेल तेंव्हा कधीही दुरूस्त करण्याचा अधिकार राखून ठेवते. या संकेतस्थळाचा मजकूर एलआयसीच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय कोणत्याही स्वरूपात, अंशत: किंवा पूर्णत: दर्शवता किंवा छापता येणार नाही.

  2. या संकेतस्थळावर प्रदान करण्यात आलेली माहिती सामग्री एलआयसीच्या पूर्व लेखी आणि स्पष्ट परवानगीशिकाय व्यापारी हेतूने नक्कल, सुधारित, अपलोड, डाउनलोड, प्रकाशित किंवा पुनर्प्रकाशित, प्रसारित किंवा अन्यथा वाटप करता येणार नाही. या संकेतस्थळावर प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही माहिती किंवा सामग्रीचे पुनरूत्पादन हे एलआयसीची पूर्व परवानगी मिळेपर्यंत प्रतिबंधित आहे आणि कॉपीराईटचे उल्लंघन ठरत आहे आणि ते एक बेकायदेशिर कृत्य मानण्यात येईल. आपल्याला विनंती की विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे आणि www.licindia.in संकेतस्थळावर असलेली माहिती, साधने आणि नियोजने .ही फक्त सर्वसामान्य माहितीसाठी आहेत आणि तुमच्या विम्याच्या आवश्यकतांचा निर्णय घेण्यामध्ये वापर करावयाची नाहीत. तुम्ही विशेषत: तुमच्या कोणत्याही विशिष्ट विमा गरजांसाठी आमच्या विमा एजंटांपैकी एखाद्याशी संपर्क साधा

  3. गोपनियता धोरण भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (www.licindia.in)या संकेतस्थळाच्या वापराचे नियंत्रण करते. एलआयसी या संकेतस्थळाच्या वापरकर्त्याची निवड करण्याचा तीचा आणि या संकेतस्थळावर कोणत्याही व्यक्तीला या संकेतस्थळावर प्रदान करण्यात आलेल्या सेवांचा वापर करण्य़ासाठी परवानगी द्यावयाची किंवा परवानगी द्यावयाची नाही याचा निर्णयकरण्याचा अधिकार राखून ठेवते.

  4. एलआयसी तुमची गोपनियता सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तुम्हाला एक सशक्त, सुरक्षित आणि ऑनलाईन अनुभव देऊ करण्याचे काम करण्यासाठी वचनबद्ध आहे. आमच्याकडून देण्यात आलेल्यापैकी काही सेवा मिळवण्यासाठी, जो तुमची व्यक्तीश: ओळख पटवतो असा सोपा तपशील देऊन तुम्हाला साईन-अप करण्याची आवश्यकता आहे. आम्हाला कार्यान्वयन करण्यासाठी आणि तुम्हाला जेंव्हा जेंव्हा त्यात बदल असतील तेंव्हा ती अद्ययावत करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहीत करण्यासाठी या अत्यल्प माहितीची गरज आहे. जेंव्हा तुम्ही हे सहजपणे चालवणा-या क्लिकच्या माध्यमातून करता, तुम्ही आम्हाला नेहमी तुमच्या संपर्कात राहण्यासाठी मदत करत असतात. जोपर्यंत अशा व्यक्ती स्वत:हून अशी माहिती प्रदान करत नाही तोपर्यंत

  5. www.licindia.in व्यक्तींची वैय्यक्तिक माहिती गोळा करत नाही. हे अनेक मार्याने असू शकते उदाहरणाने, स्पर्धेसाठी नोंदणीच्या माध्यमातून, स्थळाच्या वर्गणीसाठी नोंदणीची प्रक्रिया किंवा समुदाय व्यवहार (उदा. निरोपाचा फलक), सूचना, आणि मतदान/ मतदान उपक्रम.www.licindia.in वरची वैय्यक्तिक वापरकर्त्यांची वैय्यक्तिक माहिती विकण्यात येणार नाही किंवा अन्यथा असलग्न तीस-या पक्षाला जोपर्यंत माहिती घेताना तसे नमूद केले जात नाही किंवा परिस्थीतीनुसार वापरकर्त्याची मान्यता घेतली जात नाही तोपर्यंत हस्तांतरीत करण्यात येणार नाही.

  6. जी कारवाई लागू कायदे आणि कायदेविषयक प्रक्रियांची पूर्तता करणे किंवा दुस-या वापरकर्त्याच्या अधिकारांचे संरक्षण आणि समर्थन किंवा www.licindia.in च्या सर्व वापरकर्त्यावर बंधनकारक असलेल्या सेवा अटींची अंमलबजावणी करणे हे जेथे खात्रीपूर्वक सद्भावनेतून आहे ते वगळता, एलआयसी तुमची वैय्यक्तिक माहिती किंवा तुमचा सेवांचा वापर खाजगी आणि गोपनियपणे वागवते आणि ती तपासत, दुरूस्त करत नाही किंवा तृतिय पक्षाला उघड करीत नाही..

  7. ज्याठिकाणी विशेषत: मान्य करण्यात आलेले आहे किंवा कार्यान्वयन किंवा नियामक कारणांसाठी आवश्यक आहे ते वगळता, एलआयसी तुम्हाला कोणताही अनपेक्षित निरोप पाठविणार नाही. जर वापरकर्त्याने निवड रद्द केली नसेल, एलआयसी कोणताही वापरकर्त्याचा इमेलचा पत्ता माहिती, प्रॉडक्ट आणि सेवासंबंथीत प्रासंगिक एमेल पाठविण्यासाठी करू शकते. असे असले तरी, वापरकर्ता अशी इमेल मिळाल्यानंतर त्यातील सूचनांचे पालन करून किंवा त्याप्रमाणे www.licindia.in वर संपर्क साधून सदस्यत्व रद्द करू शकतो.

  8. एलआयसी अनामिक आकडेवारी गोळा करू शकते, जी तुम्हा व्यक्तिश: ओळखत नाही. एलआयसी वापरकर्त्यांच्या वर्तणूकचा आणि वैशिष्टांचा संख्याशात्रीय विश्लेषण करण्याचा त्यांचा त्यातील रस आणि संकेतस्थाळांच्या विविध भागांचा वापर मोजण्यासाठी आणि जाहिरातदारांना अशी माहिती, तसेच वापरकर्त्यांची संख्या जी उघड झालेली आहे किंवा त्यांच्या जाहिरारींच्या बॅनरवर क्लिक करण्यात आलेली आहे ती कळवण्याचा अधिकार राखून ठेवते. आम्ही तृतीय पक्षाला या विश्लेषणांमधून गोळा करण्यात आलेली फक्त एकत्रीत स्वरूपाची माहितीच पुरवू.

  9. एलआयसी संकेतस्थळावरील आणि बाहेरील विशिष्ट सेवा वापरकर्त्यांना निरोप टाकणे, इमेल, माहिती, चॅट सेशनमध्ये सहभागी होणे, बातमी गट, आणि इतर ओढ गट उपक्रमासाठी पुरवेल. अशा उपक्रमांच्या दरम्यान, तुम्ही तुमच्या वैय्यक्तिक खात्यामध्ये देण्यात आलेली आहे त्याच्या पलीकडील वैय्यक्तिक माहिती देऊ शकाल.

  10. www.licindia.in चे गोपनीयतेचे धोरण या उपक्रमाच्या मार्फत संक्रमीत करण्यात आलेली माहिती वगळून आहे. जेंव्हा एलआयसी तुम्हाला अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठे प्रोत्साहन देते, तेंव्हा ती तुम्हाला तुमची वैय्यक्तिक माहिती सामायिक करताना सावधगिरी बाळगण्याचा आणि तीच्या इतर वापरकर्त्यांच्या गोपनियतेचा आदर सल्ल्ला देते.

  11. एलआयसीच्या इतर संकेतस्थळांवरील देण्यात आलेल्या दुव्यांच्या बाबतीत एकतर त्यांचा सार्वजनिक मानांकाचा दर्जा आणि सभ्यता किंवा त्यांचे वैय्यक्तिक माहितीच्या संरक्षणाचे धोरण किंवा अशा माहितीचा केला जाणारा वापर या बाबतीत जबाबदार असणार नाही. जेंव्हा तुम्ही एखाद्या दुस-या संकेतस्थळावर ठळकशब्दसमुहाच्या दुव्यामार्फत प्रवेश करता तेंव्हा तुम्ही हे मान्य करता की तुमचा सदर प्रवेश ही तुमची वैय्यक्तिक जोखीम आहे.परिणामस्वरूप, एलआयसी तुमच्या अशा ठळकशब्दसमुहाच्या दुव्यामार्फत जोडण्यात आलेल्या दुस-या संकेतस्थळावरील प्रवेशामुळे उत्पन्न होणा-या कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी स्विकारणार नाही.

  12. आम्ही तुमचे लक्ष सार्वजनिक मंचाचा वापरकर्ण्याकडे सुद्धा आकर्षीत करू ज्या ठिकाणी तुम्हाला तुमची ओळख किंवा इमेलचा पत्ता देण्यासाठी विचारले जाऊ शकेल.ही माहिती त्यानंतर सार्वजनिक डोमेनमध्ये प्रवेश करते आणि सेवा वापरून तिचा तृतीय पक्षाकडून वापर केला जाऊ शकतो. इंटरनेटवरून एलआयसीला पाठविण्यात आलेली इमेलपत्रे पूर्णत: सुरक्षित असण्याची खात्री देता येत नाही. इंटरनेटवर अशा पत्रांच्या प्रामाणिकपणाची खात्री देता येत नाही आणि वापरकर्त्याला त्याना मिळालेल्या आणि त्यांनी एलआयसीला पाठविलेल्या पत्रांमुळे उत्पन्न होण्या-या कोणत्याही नुकसानीला एलआयसी जबाबदार असणार नाही.

  13. या संकेतस्थळावर समाविष्ट माहिती आणि सामग्री तयार करत असताना जरी प्रत्येक काळजी घेणात आली असली तरी, अशी माहिती आणि सामग्री तुम्हाला ’जशी आहे’ तशी, कोणत्याही एकतर व्यक्त किंवा अव्यक्त कोणत्याही प्रकारच्या हमी शिवाय पुरवण्यात आली आहे. एलआयसी उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीच्या पर्याप्ततेची हमी देत नाही. विशेषत: या माहितीच्या आणि सामग्रीच्या संयोगाने दिलेल्या गैर-उलंघन, सुरक्षा, अचूकता, विशिष्ट हेतूसाठी साधर्म्य किंवा संगणक व्हायरस पासून मुक्तता यासाठी कोणतीही हमी नाही.

  14. या संकेतस्थळावर समाविष्ट माहिती आणि सामग्री तयार करत असताना जरी प्रत्येक काळजी घेणात आली असली तरी, अशी माहिती आणि सामग्री तुम्हाला ’जशी आहे’ तशी, कोणत्याही एकतर व्यक्त किंवा अव्यक्त कोणत्याही प्रकारच्या हमी शिवाय पुरवण्यात आली आहे. एलआयसी उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीच्या पर्याप्ततेची हमी देत नाही. विशेषत: या माहितीच्या आणि सामग्रीच्या संयोगाने दिलेल्या गैर-उलंघन, सुरक्षा, अचूकता, विशिष्ट हेतूसाठी साधर्म्य किंवा संगणक व्हायरस पासून मुक्तता यासाठी कोणतीही हमी नाही.

  15. या संकेतस्थळावर देण्यात आलेली माहिती, सामग्री, सल्ले, सूचना, स्पष्टीकरणांच्या सूचना, परिपत्रके इत्यादीं यांना एकत्रीतपणे ’सामग्री’

  16. असे म्हंटलेले आहे. जर उपरोक्त सामग्रीमध्ये कोणतीही चूक, वगळणूक, अचूकपणाचा अभाव आणि लेखनदोष इत्यादी असतील एलआयसी त्याची कोणतीही जबाबदारी गृहित धरत नाही. एलआयसी या संकेतस्थळाच्या माध्यमातून पुरवण्यात आलेल्या कोणत्याही सामग्रीच्या बाबतीत हमी देत नाही किंवा प्रतिनिधीत्व करत नाही आणि त्याची त्यावरील जबाबदारी स्पष्टपणे अस्विकृत करते. उपरोक्त सामग्रीच्या आधारावरील तुमच्या बाजूकडील कोणतीही कारवाई ही तुमच्या स्वत:च्या जोखीम आणि जबाबदारीवरील असेल.

Mon, 23 Oct 2023 08:42:07 +0000 : शेवटचा बदललेले

Navigation

Navigation

Navigation

Navigation

Navigation

Navigation