मुख पृष्ठ » तळातील दुवे » सुवर्ण महोत्सची फाउंडेशन » सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना
सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना

सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील उच्च शिक्षण करणा-या विद्यार्थ्यांसाठी एलआयसीची सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना.
 

1. उद्देश
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि अशाप्रकारे त्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी अधिक चांगल्या संधी प्रदान करण्याच्या हेतूने शिष्यवृत्ती पुरस्कृत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

2. व्याप्ती
शिष्यवृत्ती भारताच्या सरकारी किंवा खाजगी महाविद्यालय/विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पुरस्कृत करावयाची आहे. तीच्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था/ नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) शी सलग्न औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांच्या पदवी पातळीवरील वर्गांचे तांत्रीक आणि व्यावसायीक अभ्यासक्रमांचा सुद्धा समावेश असेल.

3. पात्रता
विद्यार्थी जे इयत्ता १२वीची परिक्षा किंवा त्याच्या तत्सम शैक्षणिक वर्ष २०१३.१४ मध्ये उत्तीर्ण झाले असतील आणि जे इच्छुक असतील उच्च शिक्षण पुढील क्षेत्रात घेण्यासाठी
i) औषध, अभियांत्रिकी, कोणत्याही शाखेतील पदवी, कोणत्याही क्षेत्रातील पदविका किंवा तत्सम अभ्यासक्रम .

ii)सरकारी मान्यताप्राप्त महाविद्यालये/ संस्थांमार्फ्त व्यावसायीक अभ्यासक्रम किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील(आयआयटी) अभ्यासक्रम .

उपरोक्त i) साठी उमेदवार जे इयत्ता १२वीची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत किंवा शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये किमान ६०% गुणांनी किंवा तत्सम श्रेणीमध्ये आणि ज्यांच्या आई/वडील/पालकांचे सर्व स्त्रोतातून वार्षिक उत्पन्न दरवर्षी ’१,००,०००/- पेक्षा जास्त नसेल.

उपरोक्त ii) साठी प्राथमिक शैक्षणिक पात्रता इयत्ता १० पर्यंत शिथिल केली आहे किंवा तत्सम शिक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये किमान ६० टक्के मार्कांनी आई/वडील/पालकांच्या उत्पन्न मर्यादेच्या अधिन राहून.

4. कालावधी
उमेदवाराच्या नुतनीकरण आवश्यक पात्रता अटींच्या पूर्ततेच्या अधिन राहून शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी देण्यात येईल.

5. शिष्यवृत्तीचा दर
निवडण्यात आलेल्या उमेदवाराला दरसाल रू.१०,०००/- ची रक्कम पुरस्कृत करण्यात येईल जी प्रत्येकी रू.१०००/- च्या दहा माहिक हप्त्यात देय असेल. निवडलेल्या उमेदवाराच्या बॅंक खात्यावर एनईएफटीच्या मार्फत शिष्यवृत्तीची रक्कम हस्तांतरीत करण्यात येईल . म्हणून जर उमेदवारीची शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यास, बॅंक खात्याचे तपशील आणि आयएफएससी कोड ये अनिवार्य आहेत.

6. शिष्यवृत्तीसाठी अटी
(i)शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल ज्यांनी पूर्वीच्यी अंतीम परिक्षेत ६०% पेक्षा कमी नाहीत असे गुण प्राप्त केले आहेत किंवा पूर्वीच्यी अंतीम परिक्षेत तत्सम श्रेणी आणि ज्यांच्या आई/वडील/पालकांचे सर्व स्त्रोतातून वार्षिक उत्पन्न दरसाल रू. १,००,०००/- पेक्षा जास्ती नाही.

(ii)एलआयसी स्कॉलर्सची निवड गुणवत्ता आणि कौटुंबिक पार्श्वभूमीच्या आधारावर जसे इयत्ता १२ वी/१० वीमधील गुणांची टक्केवारी आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. सर्वात कमी उत्पन्न असणा-या पात्र विद्यार्थ्याला उतरत्याक्रमाने प्राधान्य देण्यात येईल.

(iii) व्यावसायीक शाखेतील उमेदवारींनी ५५% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले पाहिजेत आणि कला / शास्त्र / वाणिज्य पदवी अभ्यासक्रमात ५०% गुण किंवा अभ्यासक्रमाच्या पूर्वीच्यी अंतीम परिक्षेत तत्सम श्रेणी ज्यासाठी शिष्यवृत्ती पुरस्कृत करण्यात आलेली आहे, यात अपयश आल्यास शिष्यवृत्ती खंडीत करण्यात येईल.

(iv)कुटुंबातील एका विद्यार्थ्यापेक्षा अधिकांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.

(v) विद्यार्थी उपस्थितीच्या बाबतीन नियमीत असावेत ज्यासाठीची मोजपट्टी शाळा/महाविद्यालय/विद्यापीठाच्या संबंधित अधिका-यांकडून निश्चित करण्यात येईल.

(vi)स्वयं-रोजगाराच्या पालकांसाठी गैर न्यायालयीन मुद्रांकावरील प्रतिज्ञापत्राच्या मार्गाने उत्पन्नाचा दाखला स्वयं-प्रमाणीत आधारावर असेल आणि नोकरीतील पालकांसाठी कागदपत्रांच्या आधारावर (महसूल खात्याकडील) जसे पालकांच्या नावावरील जमीन.

(vii) जर एखाद्या विद्यार्थ्यानी शिष्यवृत्तीच्या कोणत्याही शर्ती आणि अटींचे उलंघन केल्यास, शिष्यवृत्ती स्थगित किंवा रद्द करण्यात येईल.

(viii) जर एखादा विद्यार्थ्यी खोट्या कागदपत्र / प्रमाणपत्राच्या सहाय्याने शिष्यवृत्ती प्राप्त केल्याचे आढळले, तर त्याची/तीची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल आणि देण्यात आलेली शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित एलआयसीच्या विभागीय प्रशासनाच्या विवेकाप्रमाणे वसुल करण्यात येईल.

(ix)एलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशन पात्र विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची प्रक्रिया आणि मंजूरीसाठी सविस्तर कार्यप्रणाली नेमून देईल.

(x) एलआयसीजीजेएफ कडून नियमीतपणे योजनेचे मुल्यमापन करण्यात येईल.

(xi)नियमावली एलआयसीजीजेएफ विश्वस्त मंडळाच्या विवेकाने कधीही बदलण्यात येईल.

7. अर्ज करण्याची पद्धती

मुख्यपानावरील दुव्याच्या मार्फत अर्ज फक्त ऑनलाईन दाखल करावयाचे आहेत. एकदा ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर, उमेदवाराला पोचपावती त्याने त्याच्या ऑनलाईन अर्जात पुरवलेल्या इमेल आयडीवर मिळेल. पुढील पत्रव्यवहार पोचपावतीच्या मेलमध्ये नमूद केल्याप्रमाणे विभागीय अधिका-याकडून करण्यात येईल. उमेदवारांनी अचूक इमेल आयडी आणि नंतरच्या दिवसात संवादसाठी संपर्क क्रमांक दाखल करण्याची खात्री केली पाहिजे. आवश्यकता भासल्यास या टप्प्यावर बॅंक खात्याचा तपशील आणि आयएफएससी कोड आवश्यक नाहीत.

' सध्यस्थितीत आमचे विभागीय अधिकारी उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर प्रक्रिया करत आहेत. विद्यार्थ्यांशी ते निवडक यादीत आल्यास संपर्क साधण्यात येईल. "

Top