Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » ग्राहक सेवा » एनआरआय केंद्र
एनआरआय केंद्र

एनआरआय केंद्र

एनआरआय केंद्र

एनआरआय केंद्र एनआरआय केंद्रामध्ये आपले स्वागत आहे. आम्ही येथे अनिवासी भारतीयांना (एनआरआय) आणि परदेशा नागरिकत्व असलेल्या आणि परदेशात निवास करत असणा-या मूळ भारतीय वंशाच्या लोकांना (पीआयओ) लागू असणारी महत्वाची वैशिष्टे सादर करण्याचा एक प्रयत्न केला आहे.

विषयाच्या तांत्रीक भागात प्रवेश करण्या पूर्वी पॉलिसीचा योग्य प्रकार ओळखण्यासाठी, पॉलिसीच्या विमाहप्त्यांची रचना माहिती करून घेण्यासाठी आणि तुमच्या एजंट किवा एलआयसी शाखा कार्यालयाकडून आमच्या निरनिराळ्या विदीत केलेल्या योजनांवर ज्या असतील त्या, शंका उपस्थित करून घेण्यासाठी, तुम्ही विम्याची संकल्पना स्पष्टपणे माहिती करून घ्यावी अशी आमची इच्छा आहे.

विम्याची संकल्पना आणि योजनांचे निरनिराळे प्रकार:

आयुष्याच्या जोखीमीचे संरक्षण म्हणजे एखाद्या आकस्मिक घटनेच्या बाबतीत – म्हणजे अपघातामुळे येणारे मृत्यु, आजारपण, अपंगत्व यापासून कुटुंबाला आर्थिक संरक्षण – हाच विम्याचा मूळ हेतू आहे. परंतू ’सक्तीची बचत’ म्हणून सुद्धा हे बघण्यात येते ज्यामुळे संपत्ती निर्माण होते, जी मुलांचे शिक्षण/विवाह , वृद्धापकाळासाठीची तरतूद, घरबांधणी इत्यादीसाठी वापरली जाते. पॉलिसीज आयकर कायद्या पासून वजावटी प्राप्त करण्यासाठी काढल्या जातात आणि गृहकर्जासहित विविध प्रकारच्या पत सुविधा प्राप्त करण्यासाठी वित्तीय संस्थांना कर्जासाठी तारण म्हणून लागू केल्या जातात. वेगवेगळ्या लोकांच्या विविध सामाजिक-आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, एलआयसीने ४० पेक्षा अधिक प्रकारच्या योजना ज्यामध्ये संपूर्ण आयुष्याच्या योजना, एका निश्चित मुदतीसह असलेल्या एन्डोवमेंट योजना,संयुक्त आयुष्याच्या योजना, सजिवीततेचा फायदा म्हणून ओळखल्या जाणा-या नियतकालीक एकरकमी पैसे देणा-या मनी बॅक योजना, उच्च जोखीम संरक्षण असलेल्या परंतू कमी विमाहप्त्याच्या मुदतीच्या विमा योजना, पेन्शन योजना, मुलांसाठीच्या योजना, युनिट लिंक्ड योजना ज्या भांडवल बाजारामध्ये एक गुंतवणूकीची संधी पुरवतात इत्यादी इत्यादी यांचा समावेश होतो.

आमच्या प्रत्येक योजनांमध्ये विशिष्ट प्रकारचे फायद्यांचा समावेश असलेली सुस्पष्ट वैशिष्टे आहेत. निवड तुमच्या गरजांवर असते. योजनांचा तपशील ’प्रोडक्ट्स-विमा योजना’ पर्यायांतर्गत उपलब्ध आहे. प्रत्येक योजनेला ओळखण्याच्या हेतूने एक कोष्टक क्रमांक देण्यात आला आहे. उदा. कोष्टक १४ चा संदर्भ एण्डोवमेंट योजनेशी आहे जी भारतामध्ये सर्वातजास्त लोकप्रिय आहे.

विमाहप्त्याची गणिते:

एकदा दोन ते तीन योजनांची संक्षिप्त यादी बनवल्यावर, तुम्ही विमाहप्त्याचा दर आणि गणित माहितीकरून घेण्यासाठी पुढे जाल. यासाठी तुम्ही पॉलिसीची मुदत, सम एशुअर्ड, विमाह्प्ता भरण्याची पद्धत (वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक) , ठरवाल आणि जर तुमची अपघाती फायद्याच्या अतिरिक्त फायदा पाहिजे असेल. तुमच्या पसंतीच्या योजनेसाठी द्याव्या लागणा-या विमा हप्त्याचीए रक्कम माहितीकरून घेण्यासाठी तुम्ही ’टुल्स- विमाहप्ता गणक’ या पर्यायाकडे जाऊ शकता म्हणून तुम्ही इच्छीत प्रकारची विमा योजना प्राप्त करण्यासाठी पूर्ण करावयाच्या औपचारिकता जाणून घेण्याची आवश्यकता आहे.

विमा पॉलिसी घेण्यासाठीच्या आवश्यकता:

विहीत नमुन्यातील प्रस्तावाचा फॉर्म दाखल करणे (बहूतेक प्रकरणात फॉर्म क्र. ३००) ही प्राथमिक आवश्यकता आहे. वैद्यकीय अहवाल प्रस्तावकर्त्याच्या आरोग्याचे विश्लेषण करण्यासाठी आवश्यक असू शकतो.वयाचा आणि उत्पन्नाचा पुरावा, एजंटची शिफारसी, एखाद्या व्यंगाच्या किंवा गंभीर आजाराच्या इतिहासाच्या बाबतीत विशेष अहवाल इत्यादींची जोखीमीचे मुल्यमापन करण्यासाठी आवश्यकता पडू शकते. ह्या प्रक्रियेला ’अंडररायटींग’ म्हणतात आणि ते प्रस्तावाचा फॉर्म आणि त्यासारख्या कागदपत्रांमध्ये आढळणा-या वस्तूस्थितीच्या आधारावर भारतात करण्यात येते. जर प्रस्तावित आयुष्य स्विकारणीय असेल आणि पहिल्या विमाहप्त्याच्या पोटी पूरेशी रक्कम प्राप्त झाली असेल, तर स्विकृतीपत्र प्रस्तावकर्त्याला पाठविण्यात येईल आणि योग्य कालावधीत पॉलिसीच्या कराराचा दस्तऎवज जारी करण्यात येईल.

या वेळेपर्यंत तुम्हाला असे वाटू लागले असेल की प्रकरण हे जरा तांत्रीकच आहे आणि एजंटाची मदत/मार्यदर्शन खरोखरच आवश्यक आहे. होय, त्यामूळेच आम्ही मदत मिळवण्यासाठे भारतातील एजंटांची मदत घेण्याची जोरदार शिफारस करतो, जे तुमचे मार्गदर्शन आणि मदत करतील. तुम्ही एलआयसीच्या कोणत्याही विभागीय कार्यालय / शाखा कार्यालयाची मदत घेऊ शकता,ज्यांचा पत्ता तुम्ही मुख्यपानावर आढळणा-या ’लोकेटर’ या पर्यायामधून शोधू शकता. आता विषयामध्ये अधिक तपशिलासाठी उतरू या.

अनिवासी भारतीय:

 1. क अनिवासी भारतीय त्याच्या/तीच्या सध्याच्या तात्पुरते राहणा-या देशात वास्तव्य करणारा आणि भारत सरकारने जारी केलेले पारपत्र धारण करणारा हा एक भारतीय नागरिक असतो.
 2. अनिवासी भारतीय हा ग्रीन कार्ड होल्डर असू शकत नाही. त्याने/तीने सध्याच्या देशात किंवा इतर कोणत्याही देशात त्याच्या/तीच्या नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केलेला नसावा किंवा नजिकच्या भविष्यात तशा अर्ज करण्याची योजना नसावी.
 3. हे स्पष्ट करण्यात येते की परदेशी नागरिकत्व असलेले मूळ भारतीय वंशाचे लोक (पीआयओ) हे विम्याच्या मुभा हेतूने अनिवासी भारतीय म्हणून समजण्यात येत नाहीत. शेवटच्या परिच्छेदात पीआयओंना लागू असणारे नियम देण्यात आले आहेत
 4. पॉलिसीज या फक्त भारतीय रूपयांमध्येच जारी करण्यात येतात. आमच्या शाखा / संयुक्त उपक्रम कंपन्या (तपशीलासाठी मुख्यपानावरील ’सहकारी’ हा पर्याय पहा) या त्यांच्या स्थानिक चलनामध्ये पॉलिसीज जारी करतात.उदा. आमची यु.के शाखा स्टर्लिंग पाउंड चलनामध्ये पॉलिसी जारी करते
 5. अनिवासी भारतीयांना त्यांच्या भारत भेटीच्या वेळी विम्याची मुभा आहे जेंव्हा सर्व औपचारिकता त्यांच्या भारतातील वास्तव्याच्या दरम्यान पूर्ण करण्यात येतात. अशा बाबतीत विम्याची मुभा देण्यासाठी त्यांना भारतीय आयुष्यांच्या बरोबरीनेच समजण्यात येईल.
 6. अनिवासी भारतीय त्यांच्या रहिवासाच्या सध्याच्या देशांमधून सुद्धा विम्याचे संरक्षण मिळवू शकतात ज्यात सर्व औपचारिकता त्यांच्या रहिवासाच्या सध्याच्या देशातच पूर्ण केल्या जातात आणि या प्रक्रियेला ’ मेल ऑर्डर बिझनेस’ म्हणातात..
 7. मुभा असलेली किमान सन एशुअर्ड रू. २ लाख असेल आणि कमाल ही विमायोग्यतेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. तथापी मेल ऑर्डर बिझनेस अंतर्गत, कमाल सम एशुअर्ड रू. एक कोटीच्या या मर्यादेपर्यंतच असेल.
 8. मुभा असलेली किमान सन एशुअर्ड रू. २ लाख असेल आणि कमाल ही विमायोग्यतेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. तथापी मेल ऑर्डर बिझनेस अंतर्गत, कमाल सम एशुअर्ड रू. एक कोटीच्या या मर्यादेपर्यंतच असेल.
 9. सर्व प्रकारच्या योजनांची मुभा असेल या अटीवर की.
  1. गुंतागुंतीच्या आजारपणाचा फायदा दिलेला नाही.
  2. टर्म इन्शुरन्स योजनेच्या बाबतीत सम एशुअर्डच्या विशिष्ट मर्यादेपर्यंत .
  3. एशुअर्डच्या विशिष्ट टर्म रायडर बेनिफिट मर्यादित राहील.
 10. अनिवासी भारतीय अवैद्यकीय (विशेष) योजनेअंतर्गत विमा संरक्षण पाप्त करू शकतात, कांही विशिष्ट अटींवर त्यापैकी काही पुढे देण्यात आल्या आहेत:
  1. जर विमा भारत भेटीच्या दरम्यान मिळवला असेल किंवा मेल ऑर्डर बिझनेस मार्फत जेंव्हा एलआयसीचा एजंट जरूरीच्या औपचारिकता पूर्णकरण्यासाठी अनिवासी भारतीयाच्या देशातील रहिवासाच्या ठिकाणी भेट देतो तर लागू
  2. प्रवेशाच्या वेळी कमाल वय ४५ वर्षे असेल.
  3. उच्च जोखीम संरक्षणाच्या योजना आणि टर्म बेनिफिट रायडरची मुभा असणर नाही.
  4. प्रस्तावकर्ता सरकारकडे किंवा प्रख्यात व्यापारी फर्ममध्ये नोकरीला असावा किंवा सनदी लेखापाल, डॉक्टर, शिक्षक, वकील, लेखापाल, अभियंता इत्यादी सारखा व्यावसायीक असावा
  5. ही योजना त्याच अनिवासी भारतीयांना लागू आहे जे ग्रुप VI, VII आणि VIII च्या देशांमध्ये रहिवास करत आहेत (ग्रुपच्या तपशीलासाठी परिशिष्ट-V पहा) .
 11. लिखाणाच्या शेवटी ’मेल ऑर्डर बिझनेस’ मार्फत वैद्यकीय योननांतर्गत विम्याशी संबंधित नियम परिशिष्ट-I मध्ये देण्यात आले आहेत
 12. अनिवासी भारतीयांना त्याच्या भारत भेटीच्यावेळी द्यावयाच्या विमा संरक्षणाच्या बाबतीतील नियम हे भारतीय आयुष्यांना लागू असणा-या नियमांसारखेच असतील. एलआयसीच्या स्थानिक एजंट / विकास अधिकारी / शाखा कार्यालयांची मदत घेण्यात यावी. आमच्या कार्यालयांचे पत्ते पर्याय ’लोकेटर’.
 13. मधून प्राप्त करण्यात यावेत.
  1. निवडण्यात आलेल्या पॉलिसीवर अवलंबून विहीन नमुन्यातील फॉर्मस ही विमा संरक्षण मिळवण्याची मुख्य कागदपत्रे असतील.
  2. अनिवासी भारतीय प्रश्नावली (परिशिष्ट-II)
  3. वैद्यकीय अहवाल (जर प्रस्ताव अवैद्यकीय योजनेंतर्गत केलेला असेल तर लागू होत नाही)
  4. विशेष प्रश्नावली (जर प्रस्ताव ’मेल ऑर्डर बिझनेस’ अंतर्गत असेल आणी जर एजंटाने प्रस्तावकर्त्याच्या देशातील रहिवासाच्या ठिकाणी भेट दिली नसेल)- परिशिष्ट- III
  5. विशेष वैद्यकीय अहवाल, जर पारपत्राची साक्षांकित प्रत मागितली असेल.
  6. वयाचा आणि उत्पन्नाचा पुरावा.
  7. वय आणि उत्पन्न पुरावा.
  8. विम्याच्या नियोजित योजनेंतर्गत विम्याच्या हप्त्याच्या समतुल्य सुरवातीची जमा रक्कम.
 14. पत्ता, अतिरिक्त आणि इतर बंधनकारक अटींसारख्या तपशीलासाठी कृपया परिशिष्ट- V चा संदर्भ घेण्यात यावा..

परदेशी नागरिकत्व असलेले आणि परदेशात रहिवास असलेले मूळ भारतीय वंशाचे लोक

 1. प्रस्ताव फक्त वैद्यकीय योजनेंतर्गत असतील.
 2. फक्त भारतातील वास्तव्याच्या दरम्यान, पॉलिसी भारतीय चलनात जारी करण्यात येईल.
 3. नियुक्त एलआयसी एजंटाचा अहवाल अनिवार्य आहे.
 4. दाव्याची रक्कम भारतामध्ये फक्त भारतीय चलनातच अदा करण्यात येईल.
 5. कमाल सम एशुअर्ड रू. ५० लाख असेल आणि उच्च जोखीम योजना आणि संयुक्त आयुष्य योजनांची मुभा असणार नाही.
 6. पत्ता, अतिरिक्त आणि इतर बंधनकारक अटींसारख्या तपशीलासाठी कृपया परिशिष्ट- V चा संदर्भ घेण्यात यावा.

इतर मुद्दे
भारतात असताना घेण्यात आलेल्या सद्याच्या पॉलिसीज तुम्ही परदेशात एक अनिवासी भारतीय म्हणून निघून गेल्यानंतर सुद्धा भारतीय चलनातच चालू रहातील. कृपया एलआयसीच्या संबंधित सेवाशाखेला तुमच्या नविन दर्जा बाबत सूचित ठेवा, म्हणजे अनिवासी भारतीयत्व आणि तुमचा नविन पत्ता. कृपया साक्षांकित केलेला एनआरआय प्रश्नावलीचा फॉर्म त्यांना सादर करा (परिशिष्ट-II पहा) तुम्ही विविध मंजूर केलेल्या चॅनेल्स मार्फत एलआयसीला विम्याचे हप्ते भरणे चालू ठेवू शकता.

एलआयसी हौसिंग फायनान्स लि.च्या गृहकर्ज योजनांबद्दल आणि एलआयसी म्युच्युअल फंडाच्या मार्फत गुंतवणूक संधीसाठी अधिक माहिती घेण्यासाठी , कृपया संकेतस्थळाच्या मुख्यपानाच्या तळातील दिसणा-या ’ सहकारी’ वर क्लिक करा.

परिशिष्टे:
परिशिष्ट - I
परिशिष्ट - II
परिशिष्ट - III
परिशिष्ट - IV
परिशिष्ट - V

नेट-बॅंकिंग मार्फत प्राप्त झालेल्या विमा हप्त्यांच्या संबंधित नेहमी विचारले जाणारे प्रश्न.

आम्ही जास्तीजास्त काळजी घेतलेली आहे की सर्व महत्वाचे नियम किंवा मार्गदर्शकतत्वे ज्या असतील त्या अद्ययावत सुधारणांसहित पुरवण्यात आली आहेत का हे बघण्यासाठी आम्ही जास्तीजास्त काळजी घेतली आहे तथापी विविध घटकांवर अवलंबून नियम / मार्गदर्शक तत्बांची काही नियतकालीक आणि सततची पुनरावलोकने असू शकतात. सबब अजून अधिक आणि ताज्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सर्वात जवळच्या एलआयसी कार्यालयाशी संपर्क साधण्याची विनंती करतो.

तुम्ही तुमच्या विशिष्ट शंका co_io@licindia.com वर पाठवू शकता. नविन / सद्याच्या पॉलिसींच्या सेवांसंदर्भातील शंकांच्या बाबतीत co_crm@licindia.com वर पाठवू शकता. आमच्या प्रोडक्त आणि सेवांच्या बाबतीत आपण संतुष्ट व्हाल याची खातरजमा करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

आयुर्विम्याला कोणताही दुसरा पर्याय नाही. आयुर्विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे.