Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » ग्राहक सेवा » पॉलिसी मार्गदर्शन
पॉलिसी मार्गदर्शन

पॉलिसी मार्गदर्शन व मदतवाहीनी (हेल्पलाईन)

 

पॉलिसी धारकांसाठी मार्गदर्शन

भावी पॉलिसीधारक व ग्राहक म्हणून आम्ही आपले आमच्या ग्राहक सेवा विभागामध्ये स्वागत करतो. हा विभाग आपणास पॉलिसीच्या कराराच्या विविध वैशिष्ट्यांची व तथ्यांची माहिती देतो ज्यायोगे आपण आपल्या आयुर्विमा पॉलिसीचा जास्तीत जास्त चांगल्या रितीने फायदा घेऊ शकता. कृपया आमचे मार्गदर्शन काळजीपूर्वक वाचा.

 
आपले पॉलिसी बंधपत्र व त्याची सुरक्षितता

आपला पॉलिसी क्रमांक,

पॉलिसीच्या अटी

पॉलिसीमधील बदल,

जर आपली पॉलिसी गहाळ झाली तर,

आपला संपर्क पत्ता – आम्हास अवश्य कळवा.

पॉलिसी घेतांना वय,

नामनिर्देश

नियुक्ति,

हप्ता केव्हा भरावा,

हप्ता भरण्यासाठी दिलेला सवलतीचा कालावधी,

हप्ता कसा व कोठे भरावा,

पॉलिसीची स्थिती-कोठे पहायला मिळेल,

रद्द झालेली पॉलिसी कशी पुनर्जिवीत करता येते,

पॉलिसीवर कर्ज घेणे

पॉलिसी परत देताना येणारे मूल्य,पक्वता, जिवंत असतानाचे फायदे, अपंग वा मृत झाल्यास दावा करणे

,वेतन बचत योजने अन्तर्गत विमा पॉलिसी


मदत केंद्र (हेल्पलाईन)
आपले पॉलिसी बंधपत्र व त्याची सुरक्षितता.
आपल्या विम्याचा प्रस्ताव स्विकारल्यानंतर आपणास देण्याते येणारे कागदपत्र म्हणजे आपले पॉलिसी बंधपत्र होय. आपला विम्याचा प्रस्ताव स्विकारल्यानंतर जोखीम घेण्यास सुरुवात होते व विम्याच्या बंधपत्रात विम्याच्या अटी व फायदे नमूद केले आहेत. हे एक महत्वाचे दस्तावेज आहे व आपणास देण्यात येणार्‍या सेवां करिता ह्याचा उपयोग होईल म्हणून हे बंधपत्र नीट ठेवावे. विम्याच्या दाव्याचे निराकरण करताना ह्याची आवश्याकता भासेल. विमा पॉलिसी असाईन करताना वा कर्ज घेतानाही ह्याची आवश्यकता भासेल. पॉलिसी कोठे ठेवली आहे ह्याची कल्पना आपल्या माता पिता, मुले व पती /पत्नीस द्या. जर आपण आपली पॉलिसी एखाद्या कार्यालयास वा व्यक्तीस सुपूर्त करणार असाल तर लेखी पावती घ्या. पॉलिसीची एक फोटो प्रत आपल्या जवळ संदर्भासाठी ठेवा.

आपला पॉलिसी क्रमांक
पॉलिसी क्रमांक नऊ आकड्यांचा असतो व आपल्या पॉलिसी बंधपत्राच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात तो तुम्हाला आढळेल. हा एक विशिष्ट ओळख देणारा क्रमांक असून ह्यामुळे आपली पॉलिसी इतर पॉलिसीपासून वेगळी राहते व आजीवन ती तशीच राहते. पत्र व्यवहार करताना हा पॉलिसी क्रमांक लिहिण्यास विसरू नका, कारण ह्यामुळे आपली पॉलिसी जलद मिळण्यास मदत होते.


पॉलिसीच्या अटी
प्रत्येक पॉलिसी निराळ्या कारणासाठी घेतली जाते त्यामुळे आपल्या पॉलिसीच्या अटी व नियम आपल्या पॉलिसी चा प्रकार व कालावधी वर अवलंबून असेल. वर नमूद केलेली माहिती व इतर माहिती जसे, नामनिर्देशित, आपला पत्ता, आपल्या पॉलिसीच्या पहिल्या पानावर पॉलिसी शेड्युल मध्ये नमूद केलेली असेल. पॉलिसी सुरु झालेली तारीख, जन्म तारीख, पक्वतेची तारीख, हप्ता भरण्याची तारीख व महिना ही त्यामध्ये नमूद केलेले असते. दुसर्‍या पानापासून, पॉलिसीच्या विविध अटी, घेतलेली जोखीम, पर्याय दिला असेल तर घेतलेली वाढीव जोखीम, सर्व पॉलिसीना मिळणारे नियमित फायदे, जर पर्याय निवडला असेल तर अपघात विमा फायदे, एखादी जोखीम घेतलेली नसेल तर तिची माहिती व इतर अटी वगैरे गोष्टी विमा करारात नमूद केलेल्या असतील. मृत्यु पश्चात मिळणार्‍या फायद्या व्यतिरिक्त विमा धारकाने निवडलेले व इतर अनेक फायदे आहेत, ज्याची माहिती आपण करून घेऊ शकता ( विमा पॉलिसीच्या अनेक फायदे व अटी व त्याचे परिणाम जाणून घेण्यासाठी येथे क्लीक करा)


पॉलिसीमध्ये बदल
आपल्या पॉलिसीचा हप्ता देण्याच्या पध्दतीत बदल करणे, वा हप्त्याचा कालावधी कमी करणे असे बदल करण्याचे प्रसंग आपल्यावर येऊ शकतात. अशा स्थितीत आपणास सेवा देणार्‍या शाखेस आपला लेखी अर्ज द्यावा. आपल्या विमा पॉलिसीमध्ये अनेक बदल आपणास करता येतील (बदल जाणून घेण्यासाठी येथे क्लीक करा)

जर आपली पॉलिसी गहाळ झाली
आपली पॉलिसी गहाळ झाली आहे ह्या निर्णयाप्रत येण्यापूर्वी आपल्या घरी, आपल्या निवेशाचे इतर कागद पत्र, कामाच्या ठिकाणी, किंवा काही कारणासाठी आपल्या एजंटाकडे आपण विम्याचे कागद पत्र दिले असण्याची शक्यता आहे, अशा रितीने सर्व ठिकाणी पॉलिसीचा शोध घ्या. कदाचित पॉलिसी चे कागद पत्र आयुर्विमा महामंडळाकडे किंवा इतर वित्तीय संस्थेकडे कर्जासाठी तारण म्हणून ठेवलेले असण्याची शक्यता आहे. जर आपण आयुर्विमा महामंडळाकडून कर्ज घेतले असेल तर महामंडल पॉलिसी बंधपत्र आपल्याकडे ठेवते. ह्याचीही खात्री करा की जे कागदपत्र आपण शोधत आहात ते आधीच आयुर्विमा महामंडळाला वा इतर वित्तीय संस्थेस असाईन तर केले नाही ना. जर नैसर्गिक आपत्ती जसे आग, पूर ह्यामुळे पॉलिसी अंशतः नष्ट झाली असेल , तर पॉलिसीचा उरलेला भाग, पुरावा म्हणून, आयुर्विमा महामंडळाकडे, डुप्लीकेट पॉलिसी साठी अर्ज करताना, पाठवा. जर तुमचीअशी खात्री झाली असेल की काहीकारणाने पॉलिसी मिळणे अशक्य आहे,तर अशा वेळेस डुप्लीकेट पॉलिसी मिळण्यासाठी सोप्या उपायाचा अवलंब करावा.(डुप्लीकेट पॉलिसी मिळण्यासाठी काय करावे हे जाणण्यासाठी येथे क्लीक करा )


आपल्या संपर्काचा पत्ता :
आम्हास अवश्य कळवा.
आपला संपर्काचा पत्ता कळणे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्याशिवाय आम्ही आपणासोबत आमच्या सेवांसाठी संपर्क साधू शकणार नाही. केवळ आपला संपर्काचा पत्ता नाही म्हणून आपणास मिळणार्‍या फायद्यापासून आम्ही आपणास वंचित ठेवू इच्छित नाही. जेव्हा तुम्ही आपले निवास स्थान बदलता तेव्हा आपला नवीन पत्ता आम्हाला अवश्य कळवा. नाहीतर आम्ही आपणास, हप्तासंबंधी पत्र, पॉलिसीच्या पक्वतेसंबंधी पत्र, किंवा जीवित असताना मिळणारे फायदे ह्याविषयी पाठवलेले पत्र आपणास मिळण्यास विलंब लागेल. आपल्या विमा पॉलिसीमध्ये आपल्या निवासामध्ये, आपल्या दूरध्वनी क्र वा भ्रमण ध्वनी क्रमांकामध्ये वा ईमेल पत्त्यात काही बदल झाल्यास त्याची माहिती कळवण्याची तरतूद आहे. आपल्याला सेवा देणार्‍या शाखेस हे बदल आपल्या पॉलिसीमध्ये करण्यास सांगा.

वय नमूद करणे
आपल्या पॉलिसीचे बंधपत्र नीट वाचा व आपली जन्म तारीख त्यामध्ये नीट नमूद केली आहे की नाही ते पाहा. कारण ह्यावरच आपल्याला किती रकमेचा हप्ता द्यावा लागेल हे ठरवले जाते. शिवाय ह्यावरच आपण आमच्या कडून घेऊ शकणार्‍या भावी पॉलीसी ठरवल्या जातात. जर ह्यापूर्वी आपण घेतलेल्या पॉलिसीमध्ये आपली जन्म तारीख नमूद केलेली नसेल, व आपणाकडे सक्षम अधिकार्‍याने जारी केलेले जन्म तारखेचे प्रमाणपत्र असेल , तर त्याची एक साक्षांकित प्रत, जन्म तारीख नमूद करण्याच्या विनंतीअर्जासह तुम्ही आम्हाला पाठवा. (जन्म तारखेचे कोणते प्रमाण पत्र आयुर्विमा महामंडळाकडे स्विकार्य आहेत ते जाणण्यासाठी येथे क्लीक करा)


नामनिर्देश
नामनिर्देशित व्यक्तीचे नाव अचूक लिहिले आहे ह्याची खात्री करा. पॉलिसीच्या कालावधीत नामनिर्देशित व्यक्तीमध्ये बदल करता येतो. जर अजूनपर्यंत आपण आपल्या पॉलिसीमध्ये नाम निर्देशित व्यक्तीचे नाव नमूद केले नसेल,तर उशीर करू नका, आम्हाला लगेच कळवा. जी शाखा आपणास सेवा देत आहे तेथेच नाम निर्देशन बदल करता येतो ह्याची नोंद घ्या. नामनिर्देशित व्यक्ती ती असते जिला विम्याच्या दाव्याची पूर्ण रक्कम देय असते, जर विमा कालावधीमध्ये आपणास विमा पॉलीसीमध्ये नमूद केलेली एखादी दुर्दैवी घटना झाली. सामान्यपणे,आपणास काही झाले तर आपल्या कुटुंबास वा नामनिर्देशित व्यक्तीस, जी आपल्या अनुपस्थित कुटुंबाची,अवयस्क मुलांची जबाबदारी उचलते, जी शक्यतो पत्नी असते वा मुले असतात, त्यांना पॉलिसीचा फायदा मिळावा ह्या उद्देशाने पॉलिसी घेतली जाते.
आपण आपल्या अवयस्क मुलांचे नामनिर्देशन करू शकता, ज्या करता आपणास एका व्यक्तीस पालक म्हणून नेमावे लागते (नाम निर्देशनाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लीक करा)


नियुक्ति

जर आपण आपल्या विम्यावर आयुर्विमा महामंडळाकडून वा इतर वित्तिय संस्थेकडून कर्ज घेत असाल तर आपली पॉलीसी विम्यावर आयुर्विमा महामंडळाकडून वा इतर वित्तिय संस्थेस असायन करावी लागेल. जेव्हा पॉलीसी असायन केली जाते तेव्हा ती तुमच्या ऐवजी जिला असायन केली आहे तिच्या नावे केली जाते. कर्ज फेडल्यानंतर ती पॉलिसी पुन्हा तुमच्या नावावर केली जाते.अशा प्रकारे पॉलिसी पुन्हा तुमच्या नावावर झाल्यानंतर, नाम निर्देशन नव्याने करावे लागते. जेव्हा कर्ज नको असते तेव्हा विशेष कारणासाठी पॉलिसी असायन करता येते. (असायन करण्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लीक करा)

हप्ता केव्हा भरावा
जरी आमची नोटीस आपणास मिळाली नाही तरी विम्याचा हप्ता वेळेत भरा., कारण पोस्टामध्ये विलंब लागू शकतो. आयुर्विमा महामंडळ सामान्यपणे, हप्ता भरण्याची नोटीस एक महिना आधी पाठवते. विम्याचा हप्ता केव्हा देय आहे हे विमा पॉलिसीच्या पहिल्या पानावर नमूद केलेले असते.

हप्ता भरण्यासाठी सवलतीचा कालावधी
जरी तुम्ही हप्ता वेळेत भरला नसेल तरी व्याज न भरता हप्ता भरता येतो. अशा कालावधीस(काही प्लान वगळता) सवलतीचा कालावधी म्हणतात. हा सवलतीचा कालावधी १५ दिवसांचा असतो. ज्या ठिकाणी हप्ता भरणा करण्याचा कालावधी त्रैमासिक, अर्ध वार्षिक वा वार्षिक असतो, तेव्हा सवलतीचा कालावधी एक महिन्याचा , म्हणजे ३० दिवसापेक्षा कमी नाही, असतो.


हप्ता कोठे व कसा भरायचा ?

स्थानिक शाखेमध्ये रोख, स्थानिक धनादेश (चेक वटण्याच्या अटीस अधीन राहून )वा डी डी द्वारे हप्ता भरता येतो. डी डी, धनादेश, वा मनी ऑर्डर पोस्टाद्वारे पाठवता येतात. आपण आपला हप्ता कोणत्याही शाखेत भरू शकता कारण ९९% शाखा नेटवर्क द्वारे जोडलेल्या आहेत. हप्ते भरण्यासाठी अनेक बँका निश्चित सूचना स्विकारतात. अशा प्रकारे
श्चित सूचना देऊन बँकाना, आपल्या खात्यात डेबिट करून आयुर्विमा महामंडळास विहित महिन्यात विहित तारखेस विम्याच्या हप्त्यापोटी बँकेचा धनादेश देण्यास सांगता येते. इंटरनेटच्या माध्यमातून – विम्याचा हप्ता इंटरनेटच्या माध्यमातून एच डी फ सी बँक, आय सी आय सी आय बँक, टाईम्स मनी, बिल जंक्शन, यु टी आय बँक , बँक ऑफ पंजाब, सीटी बँक, कॉर्पोरेशन बँक, फेडरल बँक व बिल डेस्क द्वारे भरता येतो. कॉर्पोरेशन बँक व यु टी आय बँकेच्या एटीएम द्वारे ही विम्याचा हप्ता भरता येतो. इलेक्ट्रॉनिक क्लीअरींग सर्विसद्वारे