Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » ग्राहक सेवा » पॉलिसीची सध्यस्थिती
पॉलिसीची सध्यस्थिती

नोंदणी

मार्गदर्शक तत्वे

आमच्या पॉलिसीधारकांना विविध सामान्य आणि पॉलिसीची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. पॉलिसीबद्दलची माहिती बघण्यासाठी, नविन ग्राहकांनी नोंदणीप्रक्रियेमधून जाण्याची आवश्यकता आहे, ज्याचा तपशील येणा-या परिच्छेदात देण्यात आला आहे.

लॉगिन

नोंदणीकृत वापरकर्त्यांच्या वापरासाठी लॉगिनची सुविधा मुख्यपानावर पुरवण्यात आलेली आहे.

नोंदणी

सर्व नविन वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीचे वापरकर्ता नाव आणि संकेतशब्द निवडून ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरून पूर्ण करणे आवश्यक आहे.
 

  • » वापरकर्तानाव हे टिंब आणि अधोरेखित वर्णासह अक्षरी आणि अंकीय असू शकतील.
  • » संकेतशब्द हे ८ ते ३० वर्णांच्या दरम्यान असलेच पाहिजेत.
  • » माहितीची जागा (*) नी चिन्हांकित केलेली ही अनिवार्य क्षेत्रे असून ती मोकळी सोडता येणार नाहीत.
  • » पिन-कोड ६ अंकांपेक्षा अधिक असू शकत नाहीत.
  • »नोंदवलेला ई-मेल आयडी एक वैध असावा, पुढील पत्रव्यवहारासाठी.
  • » निवड करण्यात आलेला युजर आयडी अद्वितीय असावा.
  • »संकेतशब्द अद्वितीय असावेत आणि गोपनीय ठेवण्यात यावेत.
  •  

एक यशस्वी नोंदणीच्या प्रित्यर्थ पुष्टी म्हणून पॉलिसीधारकाला एक स्वयंचलित उत्तरप्रेषक मेल पाठविला जाईल.

पॉलिसीची नोंदणी

जर आपण “आपल्याकडे एलआयसीची कोणती पॉलिसी आहे कां?” या प्रश्नाला, “होय” असे क्लिक करून उत्तर दिले असल्यास, नोंदणी पूर्णकरण्यासाठी दाखल कराचे बटण क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन पॉलिसी नोंदणीचा फॉर्म प्रस्तुत करण्यात येईल.
उपरोक्त फॉर्ममध्ये आपण आपल्या प्रत्येक पॉलिसीचा पॉलिसी क्रमांक, विम्याचा हप्ता आणि विमाधारकाचे नाव (मुलांच्या योजनांच्या बाबतीत जर की ते प्रस्तावकर्त्याच्यापेक्षा वेगळे असल्यास) दाखल करणे आवश्यक आहे.
तुमच्या पॉलिसींची नोंदणी करण्यात आल्यानंतर आपण (पीडीएफ च्या स्वरूपात दर्शवण्यात आलेला) फॉर्म लगेचच किंवा नंतर आपल्या सवडीने आपल्या खात्यामध्ये लॉगिन करून छापू शकाल.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच नाही तर नंतर कधीतरी आपल्या पॉलिसीचे क्रमांक नोदवावयाची इच्छा असेल तर आपण ते तसे, कोणत्याही वेळी आणि कितीही वेळा आपल्या खात्यामध्ये लॉगिन करून करू शकाल.

ध्यानात ठेवा की आपण ज्या पॉलिसीचे एकतर प्रस्तावकर्ता किंवा विमाधारक असता त्यांची नोंदणी करू शकाल.
आपण फॉर्म छापून, स्वाक्षांकीत करून तो, फॉर्म मध्ये नमूद करण्यात आलेल्या पॉलिसींपैकी किमान एका सेवादेण्यात आलेल्या पॉलिसीच्या एलआयसीच्या सर्वात जवळच्या शाखा कार्यालयामध्ये दाखल करणे आवश्यक आहे. ती शाखा आपल्याला युजर आयडी प्रमाणे पोचपावती देईल. ही छापून किंवा नोंदणीच्या दरम्यान नमूद केलेल्या ईमेल आयडीवर ईमेलने पाठवता येईल

ही शाखा आपल्या सर्व पॉलिसींची, पॉलिसीसोबतच्या गोषवा-यांच्या सारांशावर आधारित तपासण्या पूर्ण झाल्यानंतर वैधता पूर्ण करेल.

रहिवासी पत्त्यामध्ये बदलकरण्याची विनंती यासारख्या ऑनलाईनवरील क्रियाशीलतांमध्ये अधिकृत प्रवेशाची सुविधा देण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया ही आवश्यक आहे.

पॉलिसी वाढवा 

हे पान फक्त यशस्वी नोंदणी नंतरच उपलब्ध होईल. नोंदणी नंतर पॉलिसीधारक पॉलिसी क्रमांक आणि विम्याच्या हप्त्याची रक्कम देऊ शकतील. उत्तरादाखल पॉलिसीधारकाला मेल पाठविण्यात येईल. जर पॉलिसीच्या तपशीलात कोणतीही चूक आढळून आल्यास, पॉलिसीधारकाला तपशीलात बदल करण्यासाठी स्मरणाची मेल पाठविण्यात येईल. जर पॉलिसीची नमूद करण्यात आलेली माहिती बिनचूक असेल तर पॉलिसीबद्दलची स्थितीदर्शक माहिती दर्शवण्यात येईल. जर पॉलिसी क्रमांक सुधारण्यात आला नसेल तर, ५व्या दिवशी पॉलिसी क्रमांक हटविला जाईल आणि स्मरणाची मेल त्यांना पाठविण्यात येईल.
 

  • » पॉलिसी क्रमांक ६ ते ९ क्रमांकांच्या मधीलच असावा.
स्थिती,

यशस्वी नोंदणीची स्थिती, ग्राहकाला पॉलिसी (एक/अनेक), कर्ज, पुनरूज्जीवन, विमाहप्ता देय/पॉलिसीची दिनदर्शिका, परिपक्वतेची दिनदर्शिका इत्यादींबद्दलच्या माहितीसाठी प्रवेश असेल.

अभिप्रायाचा फॉर्म

पॉलिसीधारक ’अभिप्राय’ चा दुवा त्यांच्या चौकशा आणि मुल्यवान सूचना/शेरे पाठविण्यासाठी वापरू शकतील.

Life Insurance Corporation of India – Corporate Office : Yogakshema Building, Jeevan Bima Marg, P.O. Box No – 19953, Mumbai – 400 021 IRDAI Reg No- 512
Top