Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » योजना » विमा योजना » न्यु विमा बचत
न्यु विमा बचत

फायदे

 पॉलिसी दस्तऎवज(1.5 MB)

’एलआयसी’ ची न्यु विमा बचत ही एक नॉन-लिंक्ड बचतीसह संरक्षणाची सहभागी योजना आहे, जेथे विमाहप्ता योजनेच्या सुरवातीलाच एकरकमी देण्यात येतो,.ही एक मनीबॅक योजना आहे, जी योजना मुदतीच्या दरम्यान पॉलिसीच्या कालावधीत सजीवित फायद्याची रक्कम ठराविक मुदतीच्या अंतराने देण्याच्या तरतूदीसह पॉलिसीधारकाच्या दुर्दैवी मृत्युपासूनचे अर्थिक संरक्षण प्रदान करते. याशिवाय, परिपक्वतेच्या वेळी एकल विमा हप्ता ज्या असेल त्या लॉयल्टी एडीशनसह परत करण्यात येतो. ही योजना तिच्या कर्जाच्या सोईच्या माध्यमातून तरलतेच्या गरजांची सुद्धा काळजी घेते.

1.फायदे:
a)डेथ बेनिफिट
पॉलिसीच्या पहिल्या पाच वर्षात जर मृत्यु झाल्यास : सम एशुअर्ड.
पॉलिसीच्या पहिल्या पाच वर्षांनंतर जर मृत्यु झाल्यास: ज्या असेल त्या, लॉयल्टी एडीशनसह सम एशुअर्ड.

b) सजीविततेचा फायदा:
विमाधारकाच्या विशिष्ट कालांतराच्या टप्प्यावर सजीवित असण्यावर पुढीलप्रमाणे देय होईल:
पॉलिसीच्या ९ वर्षाच्या मुदतीसाठी: ३-या आणि ६ व्या पॉलिसीवर्षाच्या शेवटी प्रत्येकी सम एशुअर्डच्या १५%.
पॉलिसीच्या १२ वर्षाच्या मुदतीसाठी: ३-या, ६ व्या आणि ९ व्या पॉलिसीवर्षाच्या शेवटी प्रत्येकी सम एशुअर्डच्या १५%.
पॉलिसीच्या १५ वर्षाच्या मुदतीसाठी: ३-या, ६ व्या, ९ व्या आणि १२ व्या पॉलिसीवर्षाच्या शेवटी प्रत्येकी सम एशुअर्डच्या १५%.

c)परिपक्वतेचा फायदा:
पॉलिसीच्या मुदतीअंती विमाधारक सजीवित असताना, एकल विमा हप्त्याची रक्कम (कर आणि जो असेल तो जादाचा विमाहप्ता वगळून ) ज्या असेल त्या लॉयल्टी एडीशनसह.

d) लॉयल्टी एडीशन:
महामंडळाच्या अनुभवा प्रमाणे या योजनेखालील पॉलिसी नफ्यामध्ये सहभागी होतील आणि लॉयल्टीसाठी एडीशनसाठी पात्र होतील, लॉयल्टी एडीशन जे असेल ते पॉलिसीच्या पहिली पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर मृत्यु झाल्यास आणि परिपक्वतेच्यावेळी पॉलिसीधारक सजीवित असताना देय होईल, अशा दराने आणि अटींवर जी ’एलआयसी’ कडून जाहीर होऊ शकते.