लाभ
ची जीवन तरूण ही एक सहभागी होण्याची मर्यादित विमाहप्त्यांची नॉन-लिंक्ड योजना आहे, जी मुलांसाठी संरक्षणासह बचतीच्या वैशिष्टांचा एक आकर्षक प्रस्ताव देऊ करते. ही योजना विशेषत: वाढत्या वयाच्या मुलांच्या शैक्षणिक आणि ईतर गरजा सजीवित फायद्याची देयके २० ते २४ व्या वर्षापासून आणि परिपक्वतेचा फायदा वयाच्या २५ व्या वर्षी या माध्यमातून भागविल्या जातात. ही एक लवचिक योजना आहे, ज्यात प्रस्तावकर्ता प्रस्तावाच्या टप्प्यावर पॉलिसीच्या मुदतीत सजीतिततेच्या फायद्याचे किती प्रमाण हवे आहे याची निवड पुढील चार पर्यायांमधून करू शकतो:
पर्याय
|
सजीविततेच्या फायदा
|
परिपक्वतेचा फायदा
|
पर्याय १
|
सजीविततेचा फायदा काही नाही
|
सम एशुअर्ड १००%
|
पर्याय २
|
पाच वर्षे सम एशुअर्डच्या ५% प्रत्येक वर्षी
|
७५% सम एशुअर्ड
|
पर्याय ३
|
पाच वर्षे सम एशुअर्डच्या १०% प्रत्येक वर्षी
|
५०% सम एशुअर्ड
|
पर्याय ४
|
पाच वर्षे सम एशुअर्डच्या १५% प्रत्येक वर्षी
|
२५% सम एशुअर्ड
|
जेथे सजीविततेचा फायदा सम एशुअर्डचे ठराविक टक्केवारीचे पॉलिसीच्या वर्धापनदिनापासून योगायोगाने किंवा वयाची २० वर्षेपूर्ण झाल्यानंतर आणि तेथून पुढील प्रत्येक ४ पॉलिसी वर्धापन दिनांच्यावेळी प्रत्येक वर्षी वार्षिक देयक आहे (वरील तक्त्यात परिभाषित केल्याप्रमाणे) आणि परिपक्वतेच्यावेळी परिपक्वतेचा फायदा सम एशुअर्डची ठराविक टक्केवारी (वरील तक्त्यात परिभाषित केल्याप्रमाणे) आहे सोबत जे असतील ते सोपे प्रत्यावर्ती बोनस आणि अंतीम अतिरिक्त बोनस
निवडलेला पर्याय हा पॉलिसी कराराचाच एक भाग होईल आणि त्यात तदनंतर पर्यायात पुढील बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
याशिवाय, ही योजना कर्जाच्या सोईच्या माध्यमातून त्याच्या तरलतेच्या गरजांची सुद्धा काळजी घेते.
या योजनेची खरेदी वयवर्षे ० ते १२ पर्यंतच्या मुलांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबा यांच्यापैकी कोणालाही करता येईल.
प्रभावी पॉलिसीअंतर्गत उपलब्घ असलेले लाभ:
डेथ बेनिफिट:
पॉलिसीच्या मुदतीच्या दरम्यान मृत्यु झाल्यास (जोखीमीची सुरवात होण्यापूर्वी):
विमाधारकाचा मृत्युच्या बाबतीत, कर, जो असेल तो अतिरिक्त विमाहप्ता आणि रायडरचा हप्ता वगळता, भरण्यात आलेला विमाह्प्ता/विमाहप्ते बिनव्याजी देय होतील.
पॉलिसीच्या मुदतीच्या दरम्यान मृत्यु झाल्यास (जोखीमीची सुरवात झाल्यानंतर)
जर विम्याचे सर्व देय हप्ते भरण्यात आलेले असतील, तर “सम एशुअर्ड ऑन डेथ” परिभाषित डेथ बिनिफिट, जो असेल तो बहाल केलेला सोपा प्रतिवर्ती बोनस आणि अंतीम अतिरिक्त बोनस देय होईल. जेथे परिभाषित “सम एशुअर्ड ऑन डेथ” एकूण वार्षिक विमा हप्त्य्याच्या १० पटीपेक्षा जास्त असेल किंवा मृत्युपश्चात परिपूर्ण रक्कम देण्याचे मान्य केले असेल म्हणजे सम एशुअर्डच्या १२५%
हा डेथ बेनिफिट मृत्युच्या तारखेपर्यंत एकूण भरण्यात आलेल्या विमा हप्त्याच्या १०५% च्या पेक्षा कमी असणार नाही.
वरील उल्लेखित विमा हप्ते हे कर, असल्यास अतिरिक्त विमा हप्ता आणि रायडर हप्ता वगळून.
सजीविततेचा फायदा: सम एशुअर्डची ठराविक टक्केवारी पॉलिसीच्या वर्धापनदिनापासून योगायोगाने किंवा वयाची २० वर्षेपूर्ण झाल्यानंत तेथून लगेच येणा-या आणि त्यानंतर पुढील प्रत्येक ४ पॉलिसी वर्धापन दिनांच्यावेळी प्रत्येक वर्षी देय होईल. ठराविक टक्केवारी प्रस्तावाच्या टप्प्यावर निवडण्यात आलेल्या पर्यायावर अवलंबून असेल आणि वेगवेगळ्या पर्यायांसाठीची टक्केवारी पुढे दिल्याप्रमाणे आहे.:
पॉलिसी वर्धापनदिन योगायोगाने/ वयांची पूर्णता झाल्यानंतर
|
सजीविततेचा फायदा म्हणून देण्यात येणारी सम एशुअर्डची टक्केवारी
|
पर्याय १
|
पर्याय २
|
पर्याय ३
|
पर्याय ४
|
२० ते २४ वर्षे
|
काही नाही
|
५% प्रत्येक वर्षी
|
१०% प्रत्येक वर्षी
|
१५% प्रत्येक वर्षी.
|
पॉलिसीधारकाला प्रस्तावाच्या टप्प्यावरच वरीलपैकी एका पर्यायाची निवड करावी लागेल.
परिपक्वतेचा फायदा विमाधारक परिपक्वतेच्या नमुद तारखेला सजीवित असण्याच्या बाबतीत. प्रभावी परिपक्व पॉलिसींच्यासाठी सम एशुअर्डची ठराविक टक्केवारी देय होईल. विविध पर्यांयांतर्गत ठराविक टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
परिपक्वतेचे वय
|
पर्याय १
|
पर्याय २
|
पर्याय ३
|
पर्याय ४
|
२५ वर्षे
|
१००%
|
७५%
|
५०%
|
२५%
|
व्यतिरिक्त, जो असेल तो सोपे प्रत्यावर्ती बोनस आणि अंतीम अतिरिक्त बोनस सुद्धा देय होईल.
नफ्यामध्ये सहभाग: जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल तर, पॉलिसी महामंडळाच्या नफ्यामध्ये सहभागी होईल आणि महामंडळाच्या अनुभवाप्रमाणे जाहीर होणारे सोपे प्रत्यावर्ती बोनस प्राप्त करण्यास पात्र होईल.
ज्या वर्षी पॉलिसी क्लेममध्ये मृत्यु किंवा परिपक्वतेमुळे परिणामी होते तेंव्हा पॉलिसीअंतर्गत अंतीम अतिरिक्त बोनस सुद्धा जाहिर करण्यात येऊ शकतो.
ऎच्छीक रायडर:
’एलआयसी’ चा प्रिमीयम वेईव्हर बेनिफिट रायडर (युआयएन: ५१२बी२०४व्ही०१), विम्याचा अतिरिक्त हप्ता भरून प्रस्तावकर्त्याच्या आयुष्यावर निवडता येऊ शकेल.
उपरोक्त रायडरच्या अधिक माहितीसाठी रायडरचे माहितीपत्रक पहा किंवा सर्वाधिक जवळच्या ’एलआयसी’ च्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा.