Navigation

एलआयसी ची उद्दिष्टे

एलआयसी ची उद्दिष्टे
  1. देशामधील विमायोग्य व्यक्तींपर्यंत पोचण्यासाठी आणि त्यांना वाजवी किमतीमध्ये मृत्युपासून पुरेसे आर्थिक संरक्षण पुरवण्यासाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गामध्ये आणि विशेषत: ग्रामीण भागामध्ये आयुर्विम्याचा विस्तार करणे.
  2.  
  3. विम्याशी सलग्न बचत पर्याप्त आकर्षक बनवून लोकांची बचत जास्तीजास्त गतिशील करणे.
  4.  
  5. राष्टीय प्राधान्यक्रम आणि आकर्षक परताव्याचे बंधन डोळ्यासमोर ठेऊन, गुंतवणूक करावयाचा निधी गुंतवणूकदार आणि समग्र समुदायाच्या जास्तीजास्त फायद्यासाठी, एकूण समुदायाचे हित नजरेआड न करता, ज्यांचा पैसा विश्वासावर घेण्यात आलेला आहे त्या पॉलिसीधारकांची प्राथमिक बंधने लक्षात ठेऊन,निधीची गुंतवणूक करणे.
  6.  
  7. जास्तीजास्त काटकसरीने आणि पैसा पॉलिसीधारकांचा आहे हे ओळखून विमा व्यवसाय आयोजित करणे.
  8.  
  9. विमे धारकांच्या वैय्यक्तीक आणि सामूहिक विश्वस्त या नात्याने कार्य करणे.
  10.  
  11. सामाजिक आणि आर्थिक वातावरण बदलात उत्पन्न होऊ शकणा- या विविध गरजा विम्याद्वारे भागविणे.
  12.  
  13. तसेच विमा समूहाच्या हितासाठी सौजन्यासह परिणामकारक सेवा पुरवण्यात महामंडळामध्ये काम करणा-या सर्व लोकांचा त्यांच्या पर्याप्त क्षमतेमध्ये सहभाग करणे.
  14.  
  15. निष्टेने संयुक्त उद्दिष्ट गाठण्याच्या वाटचालीत महामंडळाच्या सर्व एजंट आणि कर्मचा-यांमध्ये त्यांचे कर्तव्य पार पाडताना सहभाग,अभिमान आणि कामाचे समाधान उंचावत ठेवणे.

  16. Wed, 29 May 2024 04:54:35 +0000 : शेवटचा बदललेले

Navigation

Navigation

Navigation

Navigation

Navigation

Navigation