Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » Top Links » आमच्या बद्दल » माहिती तंत्रज्ञान आणि एलआयसी
माहिती तंत्रज्ञान आणि एलआयसी

माहिती तंत्रज्ञान आणि एलआयसी

आपल्या सेवा देण्यात आणि व्यवसायात माहिती तंत्रज्ञानाचा परिचय करून दिलेल्या भारतातील अग्रणी संस्थेपैकी एक म्हणजे एलआयसी आहे. जवळ जवळ १० कोटी पॉलिसीजची माहिती एलआयसी मधील संगणकांमध्ये धारण करण्यात आलेली आहे. अनेक वर्षांमध्ये आम्ही संबंधित आणि सुयोग्य तंत्रज्ञानात आहोत.

सन १९६४ ने एलआयसीमधील संगणक परिचय पाहिला. युनिट रेकॉर्ड मशिनची ओळख सन १९५०च्या अखेरीस झाली जी सन १९८० मध्ये बाद करण्यात आली आणि शाखा आणि विभागीय कार्यालयांमधील पार्श्व कार्यालयाच्या संगणकीकरणासाठी १९९० मध्ये मायक्रोप्रोसेसर्सवर आधारित संगणक बदलण्यात आले. संगणकीकरणाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे प्रमाणीकरण १९९०मध्ये सुरू झाले. प्रमाणीत संगणकाची पॅकेजेस विकसीत करण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी साधारण आणि पगार बचत योजनांसाठी वापरण्यात आली.
 

दर्शनी कार्यान्वयन

एलआयसीनी जुलै १९९५ मध्ये ग्राहकांचा प्रतिसाद वाढविण्याच्या हेतूने पॉलिसीधारक आणि एजंटांना संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा उपक्रम सुरू केला. या ऑनलाईन सेवेमूळे ग्राहकांना पॉलिसीच्या सध्यस्थितीचा अहवाल मिळणे, त्यांच्या विमा ह्प्त्यांची तुरंत स्विकृती आणि पुनरूज्जीवनाचे अवतरण मिळणे, मागताक्षणी कर्जाचे उतारा मिळणे शक्य झाले. जलदगतीने प्रस्तावांचे पूर्णत्व आणि पॉलिसी दस्तऎवजांची पाठवणी हे प्रत्यक्षात उतरले. देशभरातील आमच्या सर्व २०४८ शाखा दर्शनी कार्यान्वयानी व्यापण्यात आल्या. अशाप्रकारे आमची सर्व १०० विभागीय कार्यालयांनी शाखा कार्यालयांचे १००% संगणकीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले. साधारण आणि एसएसएस पॉलिसीजच्या बाबतीतील नविन देय संबंधित मॉड्युल दर्शनी पॅकेजमध्ये कर्ज, दावे आणि विकास अधिका-यांचे मुल्यमापन या सेवा देण्यासाठी वाढविण्यात आले. ही सर्व मॉड्युल्स वेळेच्या अंतरात बचत आणि अचूकतेची खात्री यासाठी उपयुक्त सिद्ध होतात.

मेट्रो एरीआ नेटवर्क

मेट्रो एरीआ नेटवर्क, नोव्हेंबर १९९७ मध्ये शहरातील कोणत्याही शाखेमधून पॉलिसीधारकांना त्यांचे विम्याचे ह्प्तेभरणे किंवा त्यांच्या स्थितीचा अहवाल मिळवणे, सरेंडर व्हॅल्युचा उतारा, कर्जाचा उतारा मिळवणे शक्य व्हावे यासाठी मुंबईमधील ७४ शाखांना जोडणारे एक मेट्रो एरीआ नेटवर्क सुरू करण्यात आले.ही प्रणाली यशस्वीरित्या काम करत आहे.कोणत्याही कामाच्या दिवशी १०,००० पेक्षा अधिक व्यवहार या नेटवर्कमध्ये होत आहेत. अशी नेटवर्कस इतर शहरांमध्ये सुध्दा लागू करण्यात आलेली आहेत.

व्यापक क्षेत्रातील नेटवर्क

सर्व ७ प्रादेशिक अधिकारी आणि सर्व मॅन (मेट्रो एरीआ नॆटवर्क) केंद्रे ही वाईड एरीआ नेटवर्क (वॅन) ने जोडण्यात आलेली आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या पॉलिसीची माहिती पाहणे आणि विमा हप्ता भरणे कोणत्याही मॅन शहरातील कोणत्याही शाखेमधून शक्य होईल. नोव्हेंबर २००५ पर्यंत वॅना अंतर्गत आमचे भारतातील ९१ केंद्रांमधून २०३५ पेक्षा जास्त शाखांचे जाळे आहे.

इन्टरएक्टीव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टीम- (आयव्हीआरएस)

परस्पर आवाज प्रतिसाद प्रणाली आयव्हीआरएस देशभरातील ५९ केंद्रांमधून आयव्हीआरएस याआधिच कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना एलआयसीला फोन करणे आणि माहिती प्राप्त करणे (उदा. पुढील विमाहप्त्याची देय तारीख, स्थिती, कर्जाची रक्कम, परिपक्वता देय देयक, संचित बोनस इत्यादी.) शक्य होईल. सदर माहिती मागणीप्रमाणे ग्राहकांना फॅक्सने सुद्धा पाठविता येईल.

आयव्हीआरएस क्रमांक शोधण्यासाठी येथे क्लिक करा

इंटरनेटवर एलआयसी चे

आमचे इंटरनेटवरील संकेतस्थळ ही एक माहितीच्या बॅंक आहे. आम्ही एलआयसी आणि तीच्या कार्यालयांबद्दल . संकेतस्थळ अधिक गतीशील आणि परस्पर संवादी होण्यासाठीच्या दर्जावाढीवर प्रत्यत्न चालू आहेत. संपर्काची प्रक्रिया गतीमान करण्याच्या हेतूने आमचे प्रादेशिक अधिकारी, प्रादेशिक प्रशिक्षण केंदे, विकास व्यवस्थापन केंद्रे, परदेशातील शाखा, विभागीय अधिकारी आणि सर्व शाखेच्या अधिका-यांचे सुद्धा पत्ते / इमेल आयडी दाखवण्यात आले आहेत.

इंटरनेटवर विम्याचे हप्ते भरणे आणि पॉलिसीची सध्यस्थिती

(या सेवेसाठी आपल्याला नोंदणी करावी लागेल)
एलआयसीने तीच्या पॉलिसीधारकांना इंटरनेटवर विम्याचे हप्ते भरणे आणि पॉलिसीचा तपशील पाहणे यासाठी एक पूर्णपणे मोफत अतुल्य सुविधा दिलेली आहे. एकूण ११ सेवा पुरवठादारांसोबत एलआयसीने ही सेवा पुरवण्यासाठी करार स्वाक्षांकित केलेले आहेत.

इंटरनेट प्रिमीयम पेमेंट बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

इन्फॉर्मेशन किऑस्कच्या

आम्ही १५० इन्टरऍक्टीव्ह टचस्क्रिनवर आधारित मल्टीमिडीया किऑस्क मॆट्रो आणि कांही महत्वाच्या शहरात मोक्याच्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या वेगवेगळ्या माहितीसाठी उभारलेली आहेत. ही किऑस्क पॉलिसीचा तपशील पुरवणे आणि विम्याचे हप्ते स्विकारणे यासाठी सक्षम आहेत.

माहिती केंद्र

आम्ही आमची प्रोडक्ट्स, पॉलिसीच्या सेवा, शाखांचे पत्ते आणि इतर संघटनात्मक माहिती तुम्हाला पुरवण्यासाठी कुशल कर्मचा-यांच्या मनुष्यबळाने सुसज्ज ८ कॉलसेंटर्स सुद्धा उभारलेली आहेत.

कॉलसेंटर्सच्या क्रमांकांची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा